‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 07:11 AM2024-10-04T07:11:50+5:302024-10-04T07:12:03+5:30

विमानाने जवळपास पाच तासांनी उड्डाण केल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.

'My duty is over, I will not fly'; The flight from Pune was stuck for 5 hours | ‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले

‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘माझ्या कामाचे तास पूर्ण झाले आहेत; त्यामुळे मी आता विमान उडवणार नाही,’ असा पवित्रा वैमानिकाने घेतल्याचा फटका पुणे ते बंगळुरू विमान प्रवाशांना बसला. यामुळे विमानाने जवळपास पाच तासांनी उड्डाण केल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. ही घटना २४ सप्टेंबरला घडली असली तरी त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

पुण्याहून बंगळुरूला मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी जाणाऱ्या विमानामध्ये प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. बराच वेळ विमानाने उड्डाण केले नाही. त्यानंतर प्रवाशांनी केबिन कर्मचाऱ्यांना विलंबाबाबत विचारणा केली. थोड्या वेळाने वैमानिक विमानात आला व त्याने कॉकपिटचा दरवाजा बंद करत आपल्या कामाचे तास पूर्ण झाल्याचे सांगत उड्डाण करणार नसल्याचे सांगितले. 

वैमानिक बरोबरच
विमानक्षेत्रातील तज्ज्ञांनी वैमानिकाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. 

Web Title: 'My duty is over, I will not fly'; The flight from Pune was stuck for 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.