""""माझे कुटुंब माझी जबाबदारी"""" अंतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:38+5:302020-12-30T04:16:38+5:30

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेतर्फे आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अंतर्गत, कोविड-१९ या साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी ...

'' '' '' '' 'My family is my responsibility' '' '' 'Prize distribution of competitions held under | """"माझे कुटुंब माझी जबाबदारी"""" अंतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण

""""माझे कुटुंब माझी जबाबदारी"""" अंतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण

Next

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेतर्फे आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अंतर्गत, कोविड-१९ या साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजिलेल्या शालेय स्पर्धेतील विजेत्यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले़

स्पर्धेत महापालिकेच्या शाळेतील ५०० व खाजगी शाळांमधील सुमारे ३६ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते़ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर तीन क्रमाकांची निवड करून, अंतिम स्पर्धेसाठी पुणे महापालिका स्तरावर निवड करण्यात आली़

या सर्व गटांमधील विषयांमध्ये २६ महापालिका शाळांचे व ३९ खाजगी शाळांमधील ६५ विद्यार्थी विजेते ठरले़ यात प्रथम क्रनांकासाठी पाच, व्दितीयसाठी तीन व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना दोन हजार रूपयांचे रोख पारितोषिक महापौर मोहोळ यांच्याहस्ते देण्यात आले़ यावेळी मोहोळ यांनी शिक्षण विभागातील व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सहकारी व विद्यार्थी यांचे आभार मानले़ यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, सुरेश जगताप तसेच आदी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते़

---------------------------------

Web Title: '' '' '' '' 'My family is my responsibility' '' '' 'Prize distribution of competitions held under

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.