शाळा माझ्या पसंतीची
By admin | Published: June 30, 2017 03:54 AM2017-06-30T03:54:46+5:302017-06-30T03:54:46+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची महापालिका किंवा नगरपालिकांच्या शाळांत बदली करण्यासाठी ग्रामविकास विभागाची परवानगी घ्यावी लागत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची महापालिका किंवा नगरपालिकांच्या शाळांत बदली करण्यासाठी ग्रामविकास विभागाची परवानगी घ्यावी लागत होता. मात्र, शासनाने आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या विनंतीवरून महापालिका किंवा नगरपालिकेमध्ये बदली करण्याचे अधिकार दिले आहेत.
महापालिका किंवा नगरपालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या विवाहित स्त्री कर्मचाऱ्यांची विनंती अर्जावरून जिल्हा परिषद सेवेतील सरळसेवेच्या पदावर नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७, मधीन ६ (९) मध्ये ग्रामविकास विभागाने तरतूद केली आहे.
याबाबतचा नुकताच अध्यादेश जारी केला आहे. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाचा
अनेक शिक्षकांना उपयोग होणार
आहे.