ाझे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:10+5:302021-05-01T04:10:10+5:30

संचालक, सार्थक बिल्डर ॲंड ड माझे घर - विक्रम चव्हाण संचालक, सार्थक बिल्डर ॲंड डेवलपर. एकत्रित कुटुंबासाठी आदर्श रचना ...

My house | ाझे घर

ाझे घर

Next

संचालक, सार्थक बिल्डर ॲंड ड

माझे घर - विक्रम चव्हाण

संचालक, सार्थक बिल्डर ॲंड डेवलपर.

एकत्रित कुटुंबासाठी आदर्श रचना

सिंहगड रस्त्यावरील धनलक्ष्मी या बंगलो सोसायटीमध्ये माझे नव्हे आमचे घर आहे. आमचे घर, यासाठी कारण आमचे संयुक्त कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात आम्ही दोघे विवाहित भाऊ, आमची प्रत्येकी दोन मुले आणि आमचे आईवडील असे एकूण दहाजण आहोत. दहाजणांच्या गरजा लक्षात घेऊन घराचे आरेखन करणे हे सध्याच्या ʻहम दो हमारा एकʼच्या जमान्यात तसे आव्हानाचेच काम होते. मात्र आमच्या वास्तुविशारदाने ते पेलले. आर्किटेक्ट सुनील पाटील ॲंड असोसिएटसच्या संचालिका अनुजा पंडित यांनी ही किमया साधली आहे.

सोसायट्यांमधील आमच्या भूखंडाचे क्षेत्रफळ हे तब्बल तीन हजार चौरस फुटांचे. त्यावर सुमारे साडेचार हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यात ३ मास्टर बेडरूम, दोन मुले आणि दोन मुलींसाठी प्रत्येकी एक- एक असे आणखी दोन बेडरूम, दोन बैठक कक्ष (हॉल), किचन, किचन शेजारीच सीट आऊट, टेरेसवरील बैठक व्यवस्था, अशी वैविध्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. या बंगल्याच्या रचनेचे एक वैशिष्ट्य असे की, दोन हॉल बांधताना वेगळा विचार करण्यात आला. घरी पाहुणे आल्यास घरातील सदस्यांना विशेषत: आतील कक्षामध्ये जावे लागते. तशातच दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहतांना त्यांचा हिरेमोड होतो. हे टाळण्यासाठी वास्तुविशारदांनी दोन हॉलचा पर्याय सुचवला आणि आम्हीही तो पटकन मान्य केला. या रचनेमुळे होते काय की, बाहेरच्या हॉलमध्ये पाहूणे असतील तरी घरातील अन्य सदस्य दुसऱ्या हॉलमध्ये बसून मनोरंजनपर कार्यक्रम पाहू शकतात.त्यासाठी तब्बल दहाजणांच्यां क्षमतेचे होम थिएटरही बांधण्यांत आले आहे. या सुविधेमुळे कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नियोजित कार्यक्रमात फारसे व्यवधान येत नाही. आम्हाला या संकल्पनेचा चांगला उपयोग होत आहे. वास्तुरचनेचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आमची सोसायटी ही बऱ्यापैकी जुनी असल्याने मोकळ्या जागेत, नारळ, आंबा, सुपारी अशी विविध प्रकारची झाडे आहेत. त्याचा सुयोग्य वापर सीट आउटच्या सुविधेने करून घेण्यात आला आहे. अगदी किचनच्या शेजारीही असे सीट आऊट असल्याने निसर्ग सान्निध्यात सदैव रहात असल्याचा भास होतो. सिमेंटचे जंगल सर्वत्र पसरलेले असताना हे दृश्य मनाला आल्हाद देणारे आहे.

अशीच एक वेगळी सुविधा टेरेसवरही करण्यात आली आहे. तेथेही आकर्षक प्रकाशव्यवस्थेसह बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचाही फार चांगला उपयोग आम्हा कुटुंबियांना होतो.

एकूणच तुलनेने भूखंड कमी क्षेत्राचे असूनही सुयोग्य रचनेमुळे आम्हाला घराची म्हणून कोणतीही उणीव जाणवत नाही.

दिवसभराच्या धावपळीनंतर, घराची ओढ लागते त्याचे एक कारण या आगळ्या वेगळ्या रचनेतही आहे, हे नक्की.

Web Title: My house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.