माझा पशुपालक, माझी जबाबदारी अभियानाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:25+5:302021-06-04T04:09:25+5:30
यावेळी पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, कोविड जागतिक महामारीमुळे नागरिकांना बाहेर फिरण्यावर शासनाने वेळोवेळी गरजेप्रमाणे ...
यावेळी पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, कोविड जागतिक महामारीमुळे नागरिकांना बाहेर फिरण्यावर शासनाने वेळोवेळी गरजेप्रमाणे निर्बंध लावले होते आणि आहेत.अनेक उद्योग व्यवसाय काहीशे ठप्प झालेत किंवा धिम्या गतीने सुरू आहेत.अनेक नागरिकांना जास्तीत जास्त वेळ घरात थांबून राहावे लागत आहे. परंतु या परिस्थितीत ऑनलाईन मिटींग्स, मार्गदर्शनपर शिबिरे व्याख्याने यासारखे उपक्रम अगदी खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले.आज राज्यात ३०-३५ फेसबुक ग्रुप्स वर ७-८ लक्ष तरुण पशुपालक सक्रिय पध्दतीने पशुपालन व्यवसाय त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि त्यातील नवनवीन संधी आणि आव्हाने याबाबत नवनवीन तंत्रज्ञान यावर चर्चा करून ज्ञानाचे आदानप्रदान करताना दिसत आहेत, असे मंत्री केदार यांनी सांगितले.
इंदापूर तालुका मतदार संघात ऑनलाईन प्रशिक्षण अभियान व त्याअनुषंगाने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांस माझे नेहमी सहकार्य राहील. माझा पशुपालक, माझी जबाबदारी या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचा उपक्रमात नेहमी शासन सोबत असेल असे राज्यमंत्री भरणे व विकासमंत्री केदार यांनी सांगितले.