"माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत, तुम्ही घरातच थांबा"...पाच वर्षीय चिमुरड्याची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:34 PM2020-03-24T17:34:46+5:302020-03-24T17:57:55+5:30

माझ्या पोलीस पप्पांना कोरोना व्हायरमुळे घराबाहेर जाऊ नका सांगतो. पण ते माझ ऐकत नाहीत...

"My police father is on duty, you stay at home" ...five year girl request... | "माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत, तुम्ही घरातच थांबा"...पाच वर्षीय चिमुरड्याची भावनिक साद

"माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत, तुम्ही घरातच थांबा"...पाच वर्षीय चिमुरड्याची भावनिक साद

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ट्विटरवर हँडलवरून विविध संदेशांतून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन

पिंपरी : माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत. तुम्ही घरातच थांबा, असे आवाहन एका पाच वर्षीय चिमुरड्याने केले आहे. त्याचा फोटो ट्विट करून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घराबाहेर न पडण्योच शहरवासीयांना आवाहन केले आहे.कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी वाहनांना बंदी, संचारबंदी, जमावबंदी असे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यासोबतच जनजागृती देखील केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ट्विटरवर हँडलवरून विविध संदेशांतून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. 


  मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या खुशाल वाळुंजकर यांचा मुलगा पृथ्वीराज याने एका सूचना फलकावर याबाबत आवाहन केले आहे. माझे पोलीस पप्पा व इतर शासकीय कर्मचारी, डॉक्टर आपल्या सेवेसाठी कर्तव्यावर आहेत. कृपया तुम्ही घरात रहा. मी माझ्या पोलीस पप्पांना कोरोना व्हायरमुळे घराबाहेर जाऊ नका सांगतो. पण ते माझ ऐकत नाहीत. पण तुम्ही तरी तुमच्या मुलांसाठी घरामध्ये थांबा, मनापासून विनंती, असा आवाहनात्मक संदेश फलकावर आहे. 
   पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पृथ्वीराज याचा फलकासह फोटो ट्विटरवरून व्हायरल केला आहे. त्यामुळे तो चचेर्चा विषय ठरत आहे. पृथ्वीराज याच्या भावनिक आवाहनाला नागरिकांच्या प्रतिसादाची गरज असल्याचे नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: "My police father is on duty, you stay at home" ...five year girl request...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.