माझ्या मुलाला न्याय हवा; राहुल फटांगडेच्या अाईचे भावनिक उद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 04:59 PM2018-03-28T16:59:30+5:302018-03-28T16:59:30+5:30
संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यामागणीसाठी भिडेंच्या सन्मान माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. माेर्चाला पाेलीसांनी परवानगी नाकारल्यामुळे अाेंकारेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात ठिय्या अांदाेलन करण्यात अाले.
पुणे : माझ्या मुलाच्या मारेकरांना पकडून त्यांना शिक्षा करायला हवी. माझ्या मुलाला न्याय हा मिळालाच पाहीजे अशी मागणी काेरेगांव-भीमा येथील दंगलीत मारला गेलेल्या राहुल फटांगडे याची अाई जनाबाई फटांगडे यांनी केली.
काेरेगाव-भीमा येथे दंगल भडकवल्याच्या अाराेपाखाली संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. त्यांच्या अटकेसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश अांबेडकर यांनी साेमवारी मुंबईत एल्गार माेर्चाचे अायाेजन केले हाेते. भिडेंच्या समर्थनार्थ पुण्यात श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने ठिय्या अांदाेलन करण्यात अाले हाेते. त्यावेळ जनाबाई फटांगडे बाेलत हाेत्या.
संभाजी भिडे यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी, पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी, कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा, 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई बंद पुकारणाऱ्यांकडूनच वसूल करावी अादी मागण्यांसाठी राज्यासह पुण्यातही भिडेंच्या सन्मान माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. मात्र पाेलीसांनी माेर्चाला परवानगी नाकारल्याने अाेंकारेश्वर जवळील नदी पात्रात ठिय्या अांदाेलन करण्यात अाले. यावेळी शेकडाे कार्यकर्ते सामिल झाले हाेते. हातात भगवा घ्वज अाणि विविध मागण्यांचे फलक धरण्यात अाले हाेते. अांदाेलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अापल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर निवेदनाचे जाहीर वाचन करुन अांदाेलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी बाेलताना श्रीशिवप्रतिष्ठानचे पुणे महानगर कार्यवाह प्रा.पराशर मोने म्हणाले, दिनांक १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी यांचे नाव विनाकारण गोवले जात आहे. राष्ट्रीय ऐक्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत संभाजी भिडे गुरुजी निर्दोष असल्याचे मान्य केले. मुळात दोन महिने आधीच त्यांनी हे बोलायला हवे होते. परंतु ते आता बोलले याबाबत त्यांचे स्वागतच आहे. ज्यांनी खोटी साक्ष दिली त्यांची कसून चौकशी व्हायला हवी.
या अांदाेलनावेळी माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, जिल्हाप्रमुख संजय जढर, मुकुंद मासाळ, संजय पासलकर, अविनाश मरकळे, ओंकार लांडगे, संतोष गोपाळ, रमेश कोंडे, नगरसेवक धीरज घाटे, गणेश जगताप, आदित्य मांजरे आदी उपस्थित होते.