कार्यकर्त्यांचे प्रेम, निष्ठा हीच माझी खरी ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:18+5:302021-08-17T04:16:18+5:30
खोडद : कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रेम आणि त्यांची माझ्याप्रती असलेली निष्ठा हीच माझी खरी ऊर्जा आहे. केवळ माझ्या कार्यकर्त्यांच्या ...
खोडद : कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रेम आणि त्यांची माझ्याप्रती असलेली निष्ठा हीच माझी खरी ऊर्जा आहे. केवळ माझ्या कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानासाठी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेत असून लवकरच भाजप प्रवेश करणार आहे," अशी घोषणा आशाताई बुचके यांनी केली.
हिवरेतर्फे नारायणगाव येथील हॉटेल ओसारा येथे आशाताई बुचके यांच्या समर्थकांचा मेळावा रविवारी पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आशा बुचके यांनी भाजप पक्षप्रवेशाची घोषणा केली. या वेळी संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, माजी सभापती संगीता वाघ, वारूळवाडीचे सरपंच राजू मेहेर, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, शिवा खत्री, ऋषी डुंबरे, विवेक चव्हाण, महेंद्र सदाकाळ, पंडित मेमाणे, सुरेखा गांजाळे उपस्थित होते.
आशा बुचके म्हणाल्या, आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या महिलेची हकालपट्टी झाली नाही. बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना सोडल्यानंतर जुन्नर तालुक्यात संघटना मोडकळीस आली हाती.या काळात शिवसेनेला नेतृत्वाची गरज होती. संघटनेत नेते होते पण ते एकसंध नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत मी सर्व शिवसैनिकांना एकसंध बांधून ठेवण्याचे काम केले तसेच २० वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहून तालुक्यात खऱ्या अर्थाने शिवसेना टिकवून ठेवण्याचे काम केले. शिवसेना सोडण्याची माझी कधीच इच्छा झाली नाही, मात्र पक्षाने केलेली हकालपट्टी जिव्हारी लागली आहे. एवढं सगळं होऊन देखील मागील चार महिन्यांपासून मान अपमान सहन करत शिवसेनेत प्रवेश करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्व मान अपमान सहन करून मी पुन्हा प्रवेश मिळविण्यासाठी उपनेते आढळराव पाटील यांची भेट घेतली तसेच शिवसेना भवनवर देखील गेले होती, असेही या वेळी बुचके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष माळवदकर यांनी केले व सूत्रसंचालन कुमार चव्हाण यांनी केले.
पुन्हा शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा करताना मी माझ्या स्वतःसाठी काहीही मागितलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, माझ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा पुनवर्सन करावं, अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र तरीदेखील माझ्या पदरी उपेक्षाच आली.
आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्या
१६ खोडद बुचके
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आशा बुचके.
160821\20210815_213243.jpg
कॅप्शन : हिवरे तर्फे नारायणगाव येथे रविवारी ओसारा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात आशाताई बुचके यांनी भाजप पक्षप्रवेशाची घोषणा केली.