टपरीच्या बाजूला मिळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, पाच साथीदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:01+5:302021-01-04T04:10:01+5:30
संतोष (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) याचा खून झाला असून, हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत रामचंद्र गायकवाड यांनी ...
संतोष (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) याचा खून झाला असून, हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत रामचंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण शंकर व्यास ( वय ३०, रा. रामदरा रोड, साठेवस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. रेणवास ता. कोठडी, जि. भिलवाडा, राजस्थान) या केटरर्ससह नारायण शंकर व्यास (वय ३०, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर), जितेश तुकाराम कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी कॉर्नर, मारुती मंदिराशेजारी, हडपसर), संतोष सुंदर पुजारी (वय ३५, जनवाडी, जनता वसाहत, गोखलेनगर, पुणे) व संपत मारुती कळंत्रे (वय ४१, रा. भाजीमंडई जवळ, हडपसर) यांना जणांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार : १ जानेवारी रोजी सकाळी १० - ४० वाजण्याच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी (क्रमांक आरजेे ०६ जीव्ही ४६१७) मधून चार अनोळखी व्यक्तींनी एकास बेशुध्द अवस्थेत हडपसर परिसरातील लोहिया गार्डनलगत असलेल्या फूटपाथवर टाकून निघून गेले आहेत, अशी माहिती दिली. मााहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे पोलीस हवालदार क्षीरसागर यांच्यासमवेत घटनास्थळी पोहोचले. सदर इसमास तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालय येथे पाठवले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांंस मयत घोषित केले. गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. मयतास टाकून निघून गेलेल्या चार इसमांचा शोध घेत असताना त्यास सोडून जाणारी पिकअप जिप ही लोणी काळभोर येथील नारायण केटरर्सचे मालक नारायण व्यास यांचे मालकीचे असल्याचे समजले.
लोणी काळभोर पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ३१ डिसेंबर रोजी लोणी काळभोर येथील वास्तुशांतीकरिता नारायण व्यास याला जेवणाची आर्डर होती. तेथे जेवण वाढण्याचे काम करण्याकरिता त्याने जितेश कदम याला सांगितल्याने त्याने त्यांच्या ओळखीचे संतोष पुजारी, संपत कळंत्रे व बाप्पू यांना पाठविले. ते काम पूर्ण झाल्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा व्यास याला जेवणाची ऑर्डर असल्याने त्या तिघांना त्यांनी रामदरा रोड, साठेवस्ती येथील घरी ठेवून घेतले. त्या ठिकाणी रात्री १० - ३० वाजण्याच्या सुमारास मयत व इतर दोघे झोपले त्यानंतर, १ जानेवारी रोजी सकाळी संतोष हा झोपेतून उठला नाही म्हणून त्याला चौघांनी उचलून नारायण व्यास यांचे पिकअप गाडीमध्ये झोपवले व मगरपट्टा चौकातील लोहिया गार्डन येथे सकाळी १० - ४० वाजण्याच्या सुमारास गाडीतून बाहेर काढून रोडलगत असलेल्या नीरा टपरीच्या बाजूला फूटपाथावर ठेवून निघून आले. सदरबाबतची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी पाच जणांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.