शैक्षणिक प्रशिक्षणात नागपूर आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:12+5:302020-12-30T04:16:12+5:30

पुणे : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेतर्फे (मिपा) शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमधील शाळा ...

Nagpur at the forefront of educational training | शैक्षणिक प्रशिक्षणात नागपूर आघाडीवर

शैक्षणिक प्रशिक्षणात नागपूर आघाडीवर

Next

पुणे : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेतर्फे (मिपा) शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमधील शाळा प्रमुखांना मर्गदर्शन केले जात आहे. त्यास नागपूर जिल्ह्यातल्या शाळाप्रमुखांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. इतर जिल्ह्यातल्या खासगी व शासकीय शाळांनीही या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘मिपा’च्या संचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा) अंतर्गत राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास केंद्रा(एनसीएसएल)मार्फत देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळाप्रमुखांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. राज्यात ‘मिपा’च्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यास सुरूवात झाली आहे. राज्यभरातून ७ हजार ८६९ शाळा प्रमुखांनी यासाठी नोंदणी केली आहे.

यात नागपूर जिल्हा अग्रस्थानी असून जळगाव, सातारा, मुंबई उपनगर, पुणे खालोखाल आहे. या जिल्ह्यांकडून प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी जिल्ह्यांची नोंदणी कमी आहे. “शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनासोबतच शालेय सुधारणा आणि परिवर्तनासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे शाळाप्रमुख व ज्येष्ठ शिक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन बेलसरे यांनी केले आहे.

---------------------

Web Title: Nagpur at the forefront of educational training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.