विद्यापीठात उभारणार नक्षत्र गार्डन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:10+5:302021-03-23T04:12:10+5:30
मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला भेट देण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येतात. त्याचप्रमाणे मुख्य इमारतीमध्ये ...
मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला भेट देण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येतात. त्याचप्रमाणे मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी भुयारी मार्ग असून काही वर्षांपूर्वी हेरिटेज वॉक म्हणून हा भुयारी मार्ग विकसित करून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला आहे. अनेकांना या भुयारी मार्ग बाबत कुतूहल आहे. सध्या कोरोनामुळे हेरिटेज वॉक बंद आहे.
विद्यापीठ आवारातील हिरवळ सर्वांनाच आकर्षित करते. त्यामुळे केवळ तरुणाईच नाही तर; ज्येष्ठ नागरिकसुद्धा विद्यापीठाच्या आवारात फिरण्यासाठी येतात. आता विद्यापीठ परिसरात आणखी एक उद्यान उभारले जाणार आहे. हत्ती तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवक वसाहतीजवळील परिसरात लवकरच नक्षत्र गार्डन उभारले जाणार आहे. त्यासाठी सीएसआर अंतर्गत निधी उभा केला जात आहे.विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बरोबरच विद्यापीठाबाहेरून येणाऱ्या नागरिकांनासुद्धा हे उद्यान आकर्षित करेल, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.