नाव, केंद्र, कक्ष शोधणे झाले सोपे
By admin | Published: February 20, 2017 02:43 AM2017-02-20T02:43:48+5:302017-02-20T02:43:48+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना त्यांच्या प्रभागासह यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्र याची माहिती
पिंपरी : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना त्यांच्या प्रभागासह यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्र याची माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे डाऊनलोड करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा प्रारंभ आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते शनिवारी झाला.
जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयुक्त वाघमारे यांनी दिली. सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, डॉ. महेशकुमार डोईफोडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, योगेश कडूसकर, अण्णा बोदडे, अनिता कोटलवार, सुधीर बोराडे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सार्वत्रिक निवडणूक२०१७ करिता मतदानाची टक्केवारीत वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महापालिका निवडणुकीकरिता मतदारांना त्यांचे नाव कोणता प्रभाग, कोणत्या मतदान केंद्रामध्ये मतदान कक्षात (खोली) व मतदार यादीमधील अनुक्रमांसह उपलब्ध होईल. त्या दृष्टीने महापालिकेने संगणकप्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे मतदारांना त्याबाबतची माहिती मतदान केंद्रांवर निर्माण केलेल्या मतदार हेल्प डेस्कद्वारे मतदानाच्या दिवशी दि. २१ फेबु्रवारी रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेपर्यंत मिळणार आहे.(प्रतिनिधी)
इलेक्शन हेल्पलाइन कॉल सेंटर तात्पुरत्या स्वरूपात सुरू
४सदरची माहिती महापालिकेच्या सारथी हेल्पलाइन क्र. ८८८८००६६६६ येथे दि. १९ फेबु्रवारी २०१७ रोजी सकाळी ७ पासून दि. २१ फेबु्रवारी २०१७ रोजी सायं. ५.३० पर्यंत उपलब्ध केली आहे. मतदारांना त्यांच्या नावाबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे उपलब्ध होण्यासाठी महापालिकेमध्ये मतदार हेल्पडेस्क निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी इलेक्शन हेल्पलाईन कॉल सेंटर (०२०-३९३३११९९) तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले असल्याचे आयुक्तांंनी सांगितले.
४महापालिकेच्या ६६६. स्रूेू्रल्ल्िरं. ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर निवडणूक या सदराखाली व्होटर सर्च या लिंकवर मतदारांना मतदान केंद्राबाबतची आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी आवश्यक प्रणाली फॉन्ट सह डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याद्वारे मतदार आपल्या संगणकावर डाऊनलोड करून संगणक प्रणालीमध्ये आपले नाव शोधू शकतील याबाबतची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.