टपालांद्वारे येणाऱ्या पत्रावर नाव, दिनांक, वार दिसतात अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 11:40 AM2021-10-25T11:40:28+5:302021-10-25T11:41:07+5:30
टपालाद्वारे मिळणाऱ्या पत्रावर अस्पष्ट शिक्के असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र मते यांनी केली आहे
पुणे : आधुनिक युगातही समाजात टपालद्वारे पात्र पाठवले जात आहे. ज्येष्ठांबरोबरच तरुणही टपालाचा योग्य वापर करताना दिसून येत आहेत. परंतु टपालाद्वारे मिळणाऱ्या पत्रावर अस्पष्ट शिक्के असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र मते यांनी केली आहे. त्यांनी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव आणि पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल यांना त्याबाबत निवेदनही दिले आहे.
पुण्याच्या टपाल विभागाने टपालांवर संबंधित कार्यालयाचे नाव, दिनांक, वार यांचे स्पष्ट दिसणारे शिक्के मारावेत असे आदेश दिले होते. त्यासंदर्भात टपाल कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी पुणे विभागातील सर्व प्रमुखांना पत्रही पाठवले होते. टपालावरील शिक्के स्पष्ट असावेत, याबाबत मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना वितरित होणाऱ्या टपालांवर संबंधित टपाल कार्यालयाचे नाव, दिनांक, वार आणि वेळेची स्पष्ट माहिती असणारे शिक्के मारावेत. अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. टपाल विभागाच्या महासंचालक कार्यालयाने या मागणीची दखल घेतल्याचे मते यांनी सांगितले.