मसाज सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय करणारे दोन जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 06:40 AM2017-11-15T06:40:14+5:302017-11-15T06:40:45+5:30
मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय करणा-या दोघांना येरवडा पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
पुणे : कल्याणीनगर येथे स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय करणा-या दोघांना येरवडा पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. स्पा सेंटरमधील सहा थाई तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी (रेस्क्यू होम) महिला संरक्षणगृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणी अंकित नवीन शहा (वय २७, रा. बंगला नं. १४, क्लोव्हर आर्च, विमाननगर) व फरहान नेहान फारूख (वय २४, रा. सिलोसिया अपार्टमेंट, वाघोली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगरसारख्या उच्चभू्र परिसरात थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली हा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू होता.
या घटनेमुळे शहरातील उच्चभ्रू परिसरात स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली छुप्या मार्गाने होणाºया वेश्याव्यवसायाकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास यंग बॉडी स्पा, एफमॉल, शॉप नं. ८, ९, १० या ठिकाणी शॉपमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली थायलंड येथील तरुणींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार तत्काळ पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार, सहायक पोलीस फौजदार
रमेश ओव्हाळ, हवालदार बाळासाहेब बहीरट, कर्मचारी मनोज कुदळे, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, महिला पोलीस शिवानी जगताप, अक्षता वीसापुरे यांच्यासह मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. फरहान मॅनेजर होता. शॉपमधील खोल्यांमध्ये थायलंड येथील सहा तरुणी सापडल्या. ३५,२०० रुपये, मोबाईल, रजिस्टर व पावती पुस्तक असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. स्पाचा मालक अंकित शहा यालादेखील घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शहरातील अवैध धंदे व वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना सर्व वरिष्ठ अधिकाºयांना पूर्वीच दिल्या आहेत. तरीदेखील हे व्यवसाय छुप्या मार्गाने तेजीत सुरूच आहेत. अशा गंभीर प्रकारांबाबत स्थानिक नागरिक वेळोवेळी तक्रारी करतात. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कल्याणी नगरमधील गुन्ह्यामुळे उच्चभ्रू परिसरात पुन्हा वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे.