नाव केवळ गणराजाचे; सक्ती मात्र बळीराजावर !

By admin | Published: September 21, 2015 04:08 AM2015-09-21T04:08:16+5:302015-09-21T04:08:16+5:30

दुष्काळसदृश परिस्थिती, वाया गेलेला हंगाम आणि पावसाने दिलेली ओढ यामुळे अगोदरच नाडला गेलेल्या बळीराजावर आता गणराजाच्या

Name is only of Ganaraja; The forced but the victim! | नाव केवळ गणराजाचे; सक्ती मात्र बळीराजावर !

नाव केवळ गणराजाचे; सक्ती मात्र बळीराजावर !

Next

पुणे : दुष्काळसदृश परिस्थिती, वाया गेलेला हंगाम आणि पावसाने दिलेली ओढ यामुळे अगोदरच नाडला गेलेल्या बळीराजावर आता गणराजाच्या नावाने वर्गणीची सक्ती केली जात आहे. पुण्यामध्ये मार्केट यार्डात भाजी विक्रीसाठी येणाऱ्या अनेक शेतकरी व मालवाहतूकदारांना या बळजबरीने वसूल केल्या जाणाऱ्या वर्गणीचा अनुभव आज आला.
मार्केट यार्डात रविवारी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मार्केट यार्ड परिसरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून सक्तीने वर्गणी गोळा केली. कोणतीही पावती न देता मार्केट यार्डमधील गणपती मंडळाचे कार्यकर्ते वाहनचालकांकडून सक्तीने पैसे वसूल करीत होते. संबंधित विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी याविषयी कोणतेही पाऊल न उचलता मौन राखले. त्यामुळे त्यात आणखी भर पडली आणि परिसरातील इतर मंडळांनीही शेतकऱ्यांकडून सक्तीचे वर्गणी वसुली केली.
मार्केट यार्डातील गणपती आडत्यांचा आणि परिसरातील व्यापाऱ्यांचा असल्याने त्याच संबंधितांकडून गणपतीची वर्गणी गोळा करणे अपेक्षित आहे, असे काही व्यापारी खासगीत सांगत आहेत. परंतु, रविवारी मार्केटयार्डात येणाऱ्या वाहनचालकांकडून मार्केटयार्डातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सक्तीने वर्गणी वसूल केली. त्यामध्ये ट्रक चालकांकडून २०० रुपयांची तर टेम्पो चालकांकडून १०० रुपये वर्गणी स्वरुपात घेतले जात होते. मार्केटयार्डच्या गेट नं. १ मधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांकडून ही वर्गणी गोळा करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातात शारदा गणेशाचे स्टिकर होते. स्टीकर देऊन वाहन चालकांना वर्गणी देण्याचा आग्रह केला जात होता. वर्गणी न देणाऱ्या वाहनास गेटच्या बाहेर जाऊ दिले जात नव्हते. तसेच त्याला अरेरावीची भाषा वापरली जात होती. मार्केटयार्ड परिसरात दर रविवारी सुमारे २०० ट्रक आणि ६०० छोटे-मोठे टेम्पो माल वाहतूक करतात. (प्रतिनिधी)

Web Title: Name is only of Ganaraja; The forced but the victim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.