नाना पटोलेंनी पुण्याच्या 'येरवड्यात' दाखल व्हावे; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 01:10 PM2022-01-18T13:10:37+5:302022-01-18T13:12:55+5:30

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत खबळजनक वक्तव्य केल होत

Nana Patole should enter Pune Yerwada Advice of Mayor Muralidhar Mohol | नाना पटोलेंनी पुण्याच्या 'येरवड्यात' दाखल व्हावे; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला

नाना पटोलेंनी पुण्याच्या 'येरवड्यात' दाखल व्हावे; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला

Next

पुणे : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत खबळजनक वक्तव्य केल होत. 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं ते म्हणाले होते. लाखनी तालुक्यातील निवडणूक प्रचारात जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी यांच्याकडून पाटोळे यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा नाना पटोले यांना ट्विटरच्या माध्यमातून सणसणीत टोला लगावला आहे. पटोले यांनी पुण्याच्या येरवड्यात दाखल व्हावे असा सल्ला दिला आहे.

मोहोळ म्हणाले, नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या. आणि पुण्यातल्या 'येरवड्या'त दाखल व्हा. तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर नावापुरता का होईना, पण 'राष्ट्रीय' पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने मा. पंतप्रधानांबद्दल काय बोलावं, याचं काडीचही भान असू नये? असा सवालही मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.  


 
''मी का भांडतो. गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-काॅलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते'' असे नाना पटोले म्हणाले होते. हा व्हिडीओ सध्या सोशलमिडीयावर जिल्ह्यात व्हायरल होत आहे.

मी आमच्याकडील गावगुंडाबाबत बोललो - नाना पटोले यांचा खुलासा 

जेवनाळा येथील सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत'ला सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही संतापले 

''पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो, असे म्हणतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय?, असा सवाल भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.'' 

''कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला, सत्तेसाठी काहीही❓. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच, नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केलीय.'' 

Web Title: Nana Patole should enter Pune Yerwada Advice of Mayor Muralidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.