नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमध्ये तब्ब्ल '१ कोटींचं सोनं अन् ५० लाख रोख'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 09:59 PM2021-10-08T21:59:29+5:302021-10-08T21:59:40+5:30

गायकवाडची सर्व लॉकर्स ही पोलिसांच्या रडावरवर असून, पोलिसांकडून गायकवाडच्या केवळ दोनच लॉकरमधून कोट्यावधींचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे

Nanasaheb Gaikwad's locker full of '1 crore gold and 50 lakh cash' | नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमध्ये तब्ब्ल '१ कोटींचं सोनं अन् ५० लाख रोख'

नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमध्ये तब्ब्ल '१ कोटींचं सोनं अन् ५० लाख रोख'

Next
ठळक मुद्देगायकवाडवर पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

पुणे : नानासाहेब गायकवाडने सावकारी आणि बळजबरीने लुटलेल्या लोकांच्या जमिनीतून कमावलेला अफाट पैसा विविध लॉकरमध्ये दडवून ठेवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यांची सर्व लॉकर्स ही पोलिसांच्या रडावरवर असून, पोलिसांकडून गायकवाडच्या केवळ दोनच लॉकरमधून कोट्यावधींचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. त्यातील एका लॉकरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा, हि-यांचे दागिने, तर दुस-या लॉकरमध्ये पन्नास लाख रुपये रोख स्वरुपात पोलिसांनी जप्त केले आहेत.

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड व गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड या पिता-पुत्रांवर खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवून नेणे, दुखापत करणे, बेकादेशीरपणे जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्निशस्त्र बाळगणे, अवैधरित्या सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर डबल मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे, (वय ४० वर्षे) दिपक निवृत्ती गवारे (वय ४५ वर्षे, दोघेही रा. शिवाजीनगर, पुणे), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा. सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नं.२,विशालनगर, पिंपळे निलख, पुणे), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती औंध पुणे) यांच्यावर देखील गुन्हा
दाखल करण्यात आले आहेत. वाळके बंधू अदयाप फरार आहेत.

आरोपींनी बेकायदेशीर मार्गाने स्वत:स व इतर साथीदारांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी पीडित व्यक्तींना अवैधरित्या व्याजाने पैसे देवून ते वसूल करण्यासाठी जबरदस्तीने जमिनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज, स्टॅम्प पेपर, लिहिलेल्या व को-या पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्हे ते करत होते. त्यामध्ये व्याजाच्या व्यवसायातून लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहिती समोर येत असून, अशा व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून गायकवाडांच्या लॉकर्सची झाडाझडती सुरू झाली असून, केवळ दोनच लॉकर्समध्ये कोट्यावधींचा खजिना सापडला असून, फिर्यादी महेश काटे यांच्याकडून बळजबरीने लिहून घेतलेली कागदपत्रे देखील सापडली आहेत.

Web Title: Nanasaheb Gaikwad's locker full of '1 crore gold and 50 lakh cash'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.