नांदोशी ग्रामस्थ खाणकामामुळे त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:35+5:302021-04-27T04:11:35+5:30
नांदोशी-सणसनगर गावाचा परिसर डोंगराळ भागाचा असून तेथे मोठ्या प्रमाणात दगडांच्या खाणी आहेत. या खाणींतून मर्यादेपेक्षा अधिक खाण उपसा होत ...
नांदोशी-सणसनगर गावाचा परिसर डोंगराळ भागाचा असून तेथे मोठ्या प्रमाणात दगडांच्या खाणी आहेत. या खाणींतून मर्यादेपेक्षा अधिक खाण उपसा होत असून त्यासंदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली असल्याने गावकऱ्यांना मोठा जाच सहन करावा लागत आहे, अशी भावना गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कोट
पहाटे तीन वाजेपासून गावात कर्कश आवाजासह खाणकामास सुरुवात होते. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. घातकी धुळीने अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून शासनाने अतिरिक्त खाणकामाला आळा घालायला हवा अशी मागणी आम्ही करत आहोत. भरत कोंढाळकर,नागरिक
गावातील वाढत्या खाणकामामुळे गावकऱ्यांना मोठा मनस्ताप आहे, असं ते सांगतात. त्याचबरोबर आम्ही खाणकाम कमी करण्यासाठी आणि गावातील नैसर्गिक साधन-संपत्ती वाचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत आहोत. -राजाराम वाटाणे,
जर गावात नैसर्गिक सौंदर्य आणी प्राण्यांचा किलबिलाट राहणार नसेल तर हे गाव लवकरच 'ओसाड' पडेल, सध्या जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून आमच्या गावाला वाचवावे. - रामचंद्र सणस
ओव्हरलोड अवजड वाहनांमुळे रस्ता पुर्णतः खचला आहे. आता आमच्यासाठी हा रस्ता प्रवासासाठी किती सुरक्षित आहे? भविष्यात अपघात वाढले तर प्रशासन याची नैतिक जबाबदारी घेईल का? -दादाभाऊ किवळे
आमच्या समस्यांशी राजकीय नेतेमंडळी आणि जिल्हा प्रशासनास काहीच घेणं-देणं उरलेलं नाही. शेतकरी आधीच संकटात असताना आता खाणकाम आमच्या पिकांचं जीव घेतंय, आम्ही हताश झालो आहोत. -अंकुश सणस