नारायण राणे यांचा नारायणगाव येथे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:14 AM2021-08-25T04:14:54+5:302021-08-25T04:14:54+5:30

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याने जुन्नर तालुक्यात शिवसेनेने नारायणगाव व जुन्नर ...

Narayan Rane's protest at Narayangaon | नारायण राणे यांचा नारायणगाव येथे निषेध

नारायण राणे यांचा नारायणगाव येथे निषेध

Next

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याने जुन्नर तालुक्यात शिवसेनेने नारायणगाव व जुन्नर येथे तीव्र आंदोलन करून निषेध करण्यात आला. हे आंदोलन जिल्हा प्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव बस स्थानकासमोर करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांना निवेदन देऊन राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शिवसेना संघटक व सरपंच योगेश बाबू पाटे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पाटे, संभाजी तांबे, शरद चौधरी, रशीद इनामदार, सरपंच महेश शेळके, संतोष वाजगे, अनिल खैरे, विकी पारखे, आरिफ आतार, संतोष दांगट, सह्याद्री भिसे, राजेश बाप्ते, रोहिदास तांबे, हेमंत कोल्हे, अभय वाव्हळ, तौसिफ़ कुरेशी, अझर कुरेशी, गौतम औटी, नीलेश दळवी ,शोभा पाचपुते ,आदी शिवसैनिक ,पदाधिकारी उपस्थित होते.

शरद सोनवणे म्हणाले की, नारायण राणे यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुख व राज्याच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्यमंत्र्याचा अवमान केला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना सन्मानाची वागणूक देऊन मुख्यमंत्री केले. राणे हे अफझलखान आहेत. भाजपला संस्कृती आहे पण राणे यांना पक्षात घेऊन राणेंनी भाजपच्या संस्कृतीचे धिंडवडे काढले आहेत. शिवसैनिक हे त्यांना धडा शिकविणार आहे.

माउली खंडागळे म्हणाले. यापुढे शिवसेनेच्या वतीने जशास तसे उत्तर दिले जाईल. सरपंच योगेश पाटे म्हणाले की नारायण राणे यांनी जुन्नर तालुक्यात येऊन दाखवा शिवसैनिक त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेवर जोडे मारून तोंडाला काळे फासताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक.

फोटो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नारायणगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले.

240821\whatsapp image 2021-08-24 at 3.23.59 pm(1).jpeg

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेवर जोडे  मारून तोंडाला काळे फासताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक

Web Title: Narayan Rane's protest at Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.