नारायणगावला सर्वपक्षीय; काटेवाडीत राष्ट्रवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:06 AM2017-12-28T01:06:18+5:302017-12-28T01:06:22+5:30

पुणे : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल बुधवारी लागला.

Narayanagawa all-party; Nationalist in Katevadi | नारायणगावला सर्वपक्षीय; काटेवाडीत राष्ट्रवादी

नारायणगावला सर्वपक्षीय; काटेवाडीत राष्ट्रवादी

Next

पुणे : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल बुधवारी लागला. यात काही दिग्गजांना आपले गड राखण्यात यश आले असले तरी काहींच्या हातातून सत्ता गेली आहे. नारायणगावमध्ये सर्व आंदाज फोल ठरवित सर्वपक्षीय सत्ता आली असून काटेवाडीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरंदर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायती सत्ताधाºयांच्या हातून गेल्या आहेत.
>बारामती तालुका
बारामती : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज जाहीर झाले.यामध्ये काटेवाडी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रस,पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व कायम राखण्यात यश आले आहे.या निकालामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे नेते बाळासाहेब गावडे या बड्या नेत्यांच्या समर्थकांना गड राखण्यात यश आले आहे.
>भोर तालुका
भोर : तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अनेक गावांत दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अनेकांनी आपले गड राखले आहेत. निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. निकालानंतर गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. कुरुंजी व टिटेघर या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.
>मुळशी तालुका
पौड : ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसºया टप्प्यासाठी मुळशी तालुक्यात झालेल्या १५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया मतमोजणीसह सुरळीत व शांततेत पार पडली. दि. २६ रोजी झालेल्या मतदानाची पौड पंचायत सभागृहात दि. २७ रोजी मतमोजणी पूर्ण झाली. सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी अवघ्या दीडतासात ११.३० वाजता पूर्ण झाली.
>जुन्नर तालुका
जुन्नर : प्रथमच थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात चुरशीच्या झालेल्या जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर करण्यात आला. जुन्नर येथील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय येथे झालेल्या मतमोजणीसाठी मोठी गर्दी झाली होती. तहसीलदार महेश पाटील यांनी निकाल जाहीर केले.
>आंबेगाव तालुका
घोडेगाव : आंबेगाव
तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. यामध्ये ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रसने, तर ४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने व २ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे. यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निरगुडसर ग्रामपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व जागांवर राष्टवादी काँग्रेसने विजय मिळविला.
>नारायणगावच्या सरपंचपदी योगेश पाटे
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व राजकीय अंदाज मोडीत ठरवून ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय पुरस्कृत योगेश ऊर्फ बाबू नामदेव पाटे २ हजार ९८८ विक्रमी मताधिक्याने विजयी झाले़ पाटे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलचे १७ पैकी १५ सदस्य विजयी झाले़ सर्वपक्षीय पुरस्कृत मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले़ यामध्ये उपसरपंच संतोष पाटे व ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग यांचा समावेश आहे.
गेली २३ वर्षे नारायणगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेले चंद्रशेखर कोºहाळे यांच्या मुक्ताई ग्रामविकास पॅनलला एकही जागा मिळाली नाही़
विशेष म्हणजे त्यांचा बालेकिल्ला असलेला वॉर्ड क्ऱ ६ मध्ये तीनही जागा पाटे यांच्या पॅनलला मिळाल्या आहेत़ मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत गेली २० वर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या व ४ वेळा उपसरपंच राहिलेल्या संतोष वाजगे यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत तिसºया स्थानावर जावे लागले आहे़
संपूर्ण उत्तर पुणे जिल्हयाचे लक्ष लागलेल्या जुन्नर तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाºया नारायणगाव ग्रामपंचायतीची मतमोजणी जुन्नर येथे झाली. गर्दी कमी होण्यासाठी पहिली मतमोजणी नारायणगावची घेण्यात आली़ पहिल्या फेरीपासूनच योगेश ऊर्फ बाबू पाटे आघाडीवर राहिले.
>बालेकिल्ल्यातही मागे
कोºहाळे यांच्या बालेकिल्ल्यातील वॉर्ड क्ऱ ६ मध्ये सर्वाधिक मतदान असल्याने तेथे काही चमत्कार होईल, असे वाटत असताना या वॉर्डमध्ये पाटे यांनी आघाडी घेत २३ जागा आपल्या पॅनलकडे खेचून आणल्या.
>काटेवाडीत राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व
माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व कायम ठेवले आहे. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भवानीमाता पॅनलने विरोधी भाजपा-रासप पुरस्कृत लोकशाही ग्रामविकास पॅनलला सर्व जागांवर अस्मान दाखविले.
संरपचपदाचे उमेदवार विद्याधर श्रीकांत काटे यांनी पांडुरंग मारुती कचरे यांचा १,५०२ मतानी दणदणीत पराभव केला. काटे यांना ३०५५, तर कचरे याना १५५३ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १चा निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागताच राष्ट्रवादीने जल्लोष सुरू केला. पहिल्या प्रभागापासून संरपचपदासाठी मताधिक्य मिळत गेले.
प्रभाग ४ मधील अपक्ष उमेदवार दीपक वाघमोडे यांनी अनपेक्षितपणे बाळू वायसे यांचा ६२ मतांनी पराभव केला, तर ही लढत राष्ट्रवादीच्या दोन गटांत झाली होती. भाजपाच्या उमेदवाराला फक्त २५ मते मिळाली. गतवर्षी ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले होते. मात्र, १५ जागांसाठी ३२ अर्ज राहिल्याने दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली.
या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, ग्रामस्थांनी ही निवडणूक हातात घेऊन विरोधकांना धोबीपछाड दिला.निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण करीत मोठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
>गावात तोफांची सलामी
संरपचपदाचे विजयी उमेदवार विद्याधर काटे व इतर विजयी सदस्यांची जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावामध्ये ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. गावातही तोफांची सलामी देण्यात आली.

Web Title: Narayanagawa all-party; Nationalist in Katevadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.