नारायणगाव पोलिसांची ८० दुचाकी वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:08+5:302021-05-18T04:10:08+5:30
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवास करताना ई-पास ...
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवास करताना ई-पास अत्यावश्यक करण्यात आलेला आहे. तो नसल्याचे आढळून आल्यास त्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला जात आहे तसेच नाकाबंदी व इतर कारवाईच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर ५०० पर्यंत दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र जिल्हाधिकारी यांना विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीमध्ये कोणीही नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय गाडी घेऊन फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यावर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच तो वापरत असलेले वाहन लॉकडॉऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नारायणगाव पोलीस कार्यक्षेत्रातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय फिरू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ताटे यांनी दिला होता. रविवारी आणि आज दोन दिवस वाहनांची कडक तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकावर पोलिसांनी कारवाई केली.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांच्यासह सहायक फौजदार शिवाजी केंगले, पोलीस हवालदार काळुराम साबळे, भोगाडे, रमेश काठे, वाहतूक नियंत्रक श्यामसुंदर जायभाये, सुरेश गेंगजे, नवीन अरगडे, होमगार्ड यांच्या मदतीने नारायणगाव पोलिसांनी केली.
दुचाकी घेऊन विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस अधिकारी पृथ्वीराज साठे व कर्मचारी.