नारायणगाव, वारूळवाडी ग्रामपंचायतींनी कचरा प्रकल्पासाठी प्रयत्न करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:55+5:302021-03-07T04:10:55+5:30
नारायणगाव-वारूळवाडी येथील कचरा डेपोची मिलिंद टोणपे यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता ...
नारायणगाव-वारूळवाडी येथील कचरा डेपोची मिलिंद टोणपे यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित आडे, पाणी पुरवठा गुणवत्ता अधिकारी विकास कुडवे, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य जंगल कोल्हे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे गवारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
टोणपे यांनी कचरा प्रकल्प उभारण्याकामी आवश्यक असणारा निधीसाठी वेगवेगळ्या विभागाची माहिती दिली तसेच वारूळवाडी येथील पाण्याची टाकी नवीन मंजुरी लवकरच देणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
०६नारायणगाव
वारूळवाडी येथील कचरा डेपोची पाहणी करताना मिलिंद टोणपे, योगेश पाटे, राजेंद्र मेहेर, जंगल कोल्हे, नितीन नाईकडे गवारी.