नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन
By रोशन मोरे | Published: June 28, 2023 02:58 PM2023-06-28T14:58:57+5:302023-06-28T15:00:21+5:30
आम्ही भारताचे नागरिक नाही का? ''आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, मौल्यवान जीव आणि घरे वाचवा”
पुणे: मणिपूरमध्ये पन्नास दिवसांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. शैक्षणिक संस्था बंद आहेत. जवळपास दोन महिने इंटरनेट बंद आहे. जीवनावश्यक वस्तू आणि आपत्कालीन वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारचा हेतू काय? शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा. सरकार गप्प का? आम्ही भारताचे नागरिक नाही का? मणिपूर हे छोटे राज्य आहे पण अनेक आंतरराष्ट्रीय खेळ, कला आणि संस्कृतीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, मौल्यवान जीव आणि घरे वाचवा” पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात. त्यांनी मन की बात सोबत मणिपुरचीही बात करावी, अशी भावना जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणाऱ्या मणिपुरी आंदोलकांनी व्यक्त केली.
सोमवारी (दि.२६) मणिपूरमधील नार्को दहशतवादी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय मैतेई नुपी लुप, या संघटनेच्या वतीने या आंदोलनाचे करण्यात आले होते. हिंचाराता बळी पडलेल्यांना आंदोलनकांनी एक मिनिट मौन पाळून तसेच प्रार्थना करून श्रद्धांजली अर्पण केली.
आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या वक्तांनी सांगितले की, मणिपुरमधील हिंसाचाराला पन्नास दिवसांहून अधिक दिवस झाले तरी पंतप्रधान मौन बाळगून आहेत आणि त्यांनी शांतता किंवा सलोखा प्रस्थापित करण्यासाठी कोणतेही आवाहन केलेले नाही. १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि ६० हजार लोक विस्थापित झाले आहेत. ते पुनर्वसन केंद्रांमध्ये आश्रय घेत आहेत, तर दररोज जोरदार गोळीबाराच्या बातम्या येत आहेत. मणिपूरच्या अनेक भागात अनेक सुरक्षा दले, जमाव जमवणे आणि चकमकी या युद्धासारख्या परिस्थितीत लोक जगत आहेत.
शांततेसाठी आवाहन
मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आणि मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी आंदोलकांनी केली.