Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:00 AM2024-06-12T11:00:49+5:302024-06-12T11:02:17+5:30

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असेल, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली

narendra modi had to take the help of chandrababu Naidu and nitishkumar to form the government Sharad Pawar | Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली - शरद पवार

Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली - शरद पवार

बारामती : मोदीसाहेबांनी (Narendra Modi) सरकार बनवले. पण त्यासाठी त्यांना चंद्रबाबू (Chandrababu Naidu), नितीशकुमार(Nitish Kumar) यांची मदत घ्यावी लागली. हे विसरुन चालणार नाही. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असेल, अशी अपेक्षा पवार शरद (Sharad Pawar) पवारांनी व्यक्त केली. बारामतीत आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. सामान्य माणसांच्या सामूहिक शहाणपणामुळे देशाची लोकशाही टीकली. गेली १० वर्ष राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत टाेकाची भुमिका घेत होेते. त्या राज्यकर्ते यांना जमीनीवर पाय टेकवले पाहिजेत, हा संदेश सर्वसामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीतून दिला, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना  लगावला. 

यावेळी पवार पुढे म्हणाले,  एकंदरीत देशाच्या निकालाचे चित्र पाहिल्यास पाच वर्षांपुर्वी  आणि आज सत्तेत असणाऱ्यांना ३०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात ६० जागांची घट झाली आहे. यात उत्तर प्रदेश हे महत्वाचे राज्य आहे. राम मंदीर हा प्रचाराचा मुद्दा असेल, राममंदीराचे मतदान सत्ताधाऱ्यांकडे जाइल, असे निवडणुकीपुर्वी  वाटले होते. मात्र, मंदीराच्या नावाने मते मागितल्यावर लोकांनी वेगळा निकाल दिला. अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला. ज्या ठीकाणी मंदीर झाले, तेथील सामान्य लाेकांनी मंदीराचे राजकारण दुरुस्त केल्याचा टोला पवार यांनी लगावला. 
 
बारामतीच्या निवडणुकीबाबत त्यावेळी माध्यमांमधून अनेक गोष्टी पुढे येत होत्या, पण बारामतीकर शहाणे आहेत.हे मला माहिती असल्याने  मी शांत होतो.बारामतीकरांचा शहाणपणा या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळाल.१२५० बुथपैकी ११९० बुथवर आम्हाला बहुमत  मिळाले.१९६७ पासून हा शहाणपणा अनुभवयास मिळत आहे.बारामतीकर शहाणपणापासून बाजूला गेले नाहीत.या बारामतीची चर्चा यंदा न्युयाॅर्कपर्यंत पोहचली.बारामतीकर साधे नाहीत,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभेत बारामतीकरांनी दिलेल्या मताधिक्यक्यावर कृतज्ञता व्यक्त केली. निवडणूक झाली. लोकांनी काय निकाल द्यायचा तो दिला. आता जबाबदारी कामाची आहे. बारामतीसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसींमध्ये मोठे उद्योग लवकरच आणले जातील, त्यासाठी केंद्र व राज्याची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली.

Web Title: narendra modi had to take the help of chandrababu Naidu and nitishkumar to form the government Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.