PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान

By नम्रता फडणीस | Published: July 31, 2023 09:02 PM2023-07-31T21:02:23+5:302023-07-31T21:04:06+5:30

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन पुरस्कारार्थी एकाच व्यासपीठावर

Narendra Modi is the first sitting Prime Minister to be honored with the Lokmanya Award | PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान

PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान

googlenewsNext

पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी (दि. १) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराने सन्मानित केले जाणारे मोदी हे पहिलेच विद्यमान पंतप्रधान ठरणार आहेत. १९८०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनादेखील हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, त्यांची हत्या झाल्यामुळे त्यांना १९८५ मध्ये मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी हे माजी पंतप्रधानदेखील या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

देशहितासाठी नि:स्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९८३ पासून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्याची परंपरा सुरू झाली. या पुरस्काराचा प्रथम मान समाजवादी पक्षाचे नेते एस. एम. जोशी यांना मिळाला होता. दुसरा पुरस्कार गोदावरी परुळेकर (१९८४) आणि तिसरा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (१९८५) यांना मरणोत्तर देण्यात आला होता.

आजपर्यंत श्रीपाद अमृत डांगे (१९८६), अच्युतराव पटवर्धन (१९८७), खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर १९८८), सुधाताई जोशी (१९८९), मधू लिमये (१९९०), बाळासाहेब देवरस (१९९१), पांडुरंगशास्त्री आठवले (१९९२), डॉ. शंकर दयाळ शर्मा (१९९३), अटल बिहारी वाजपेयी (१९९४), टी. एन. शेषन (१९९५), डॉ. रा. ना. दांडेकर (१९९६), डॉ. मनमोहन सिंग (१९९७), डॉ. आर. चिदंबरम (१९९८), डॉ. विजय भटकर (१९९९), राहुल बजाज (२०००), प्रा. एम. एस. स्वामीनाथन (२००१), डॉ. वर्गीस कुरियन (२००२), रामोजी राव (२००३), एन. आर. नारायण मूर्ती (२००४), सॅम पित्रोदा (२००५), जी. माधवन नायर (२००६), डॉ. ए. सिवाथानू पिल्लई (२००७), मॉन्टेकसिंग अहलुवालिया (२००८), प्रणव मुखर्जी (२००९), शीला दीक्षित (२०१०), डॉ. कोटा हरिनारायण (२०११), डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे (२०१२), डॉ. ई. श्रीधरन (२०१३), डॉ. अविनाश चंदेर (२०१४), सुबय्या अरुणन (२०१५), शरद पवार (२०१६), आचार्य बाळकृष्ण (२०१७), डॉ. के. सिवन (२०१८), बाबा कल्याणी (२०१९), सोनम वांगचूक (२०२०), डॉ. सायरस एस. पूनावाला (२०२१) आणि डॉ. टेस्सी थॉमस (२०२२) यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी सिंहगर्जना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासन आणि विकासासाठी सुराज्याची व्यक्त केलेली गरज आणि त्यासाठी आखलेली धोरणे, हे त्याच दिशेने पाऊल टाकल्याने हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक यांनी सांगितले.

दोन पुरस्कारार्थी एका मंचावर 

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१६ मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मंगळवारी (दि. १) शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन पुरस्कारार्थी एकाच व्यासपीठावर येत आहेत. पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असा उल्लेख मोदी यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात केला हाेता. आता राजकीय परिस्थिती बदलली असताना पंतप्रधान माेदी आणि पवार एकाच मंचावर असून, ते काय बाेलणार? याविषयी पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Narendra Modi is the first sitting Prime Minister to be honored with the Lokmanya Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.