हम मख्खन पे लकीर खिंचनेवालों मेंसे नही, पत्थर पे लकरी करनेवालोंसे है,’’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 08:00 PM2019-10-17T20:00:57+5:302019-10-17T20:09:28+5:30
पुणे जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांनी गुरुवारी (दि. १७) पुण्यातल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सभा झाली. यावेळी ते बोलत होते
पुणे :‘‘सन २००७ मध्ये देशाने ‘फर्स्ट ट्रिलीयन’ची मजल गाठली. त्यासाठी साठ वर्षे लगाली. पुढचा ‘ट्रिलीयन’ गाठण्यासाठी आठ वर्षे लागली. पण गेल्या चार वर्षात आणखी एक ‘ट्रिलीयन’ जोडला गेला. आमचे इरादे बुलंद आहेत आणि लक्ष्य भव्य आहे. त्यामुळे ‘फाईव्ह ट्रिलीयन’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न हा केवळ आकडा नाही. १३० कोटी भारतीयांच्या स्वप्नांशी जोडलेला हा संकल्प आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांनी गुरुवारी (दि. १७) पुण्यातल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, खासदार गिरीश बापट, भाजपाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, 'अर्थव्यवस्था जितकी मोठी तितक्या वेगाने गरीबी हटेल. मध्यमवर्गाचा जीवनस्तर उंचावेल. तितक्याच वेगाने आम्ही तरुणाईच्या आकांक्षा पूर्ण करु,’’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. ‘‘ज्या लोकांमध्ये निराशा भरलेली आहे, त्यांनी लक्षात ठेवावे मोदी है तो...,’’ असे म्हणताच ‘मुमकीन है’ असे म्हणत पुढचे वाक्य श्रोत्यांनी पूर्ण केले. ‘‘मख्खन पे लकीर करनेवालोमेंसे हम नही. पत्थर पे लकरी करनेवालोंसे है,’’
विधानसभेला लोकसभेच्या निवडणुकीचे सगळे विक्रम तोडून टाका
‘‘गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीसांचे स्वच्छ आणि स्थिर सरकार तुम्ही पाहिले. ते अजून सशक्त केले पाहिजे. जे सरकार निवडाल ते देश आणि समाजाचे भले करणारे असले पाहिजे. आज मोदी जे काही करतो ते तुम्ही केलेल्या मतदानामुळे. तुम्ही मतदानाचे कष्ट घेतले नसते तर मी काही करु शकलो नसतो. त्यामुळे विधानसभेला लोकसभेच्या निवडणुकीचे सगळे विक्रम तोडून टाका. महाराष्ट्राच्या उज्जवल भविष्यासाठी हे आवश्यक आहे,’’ असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.