नरेंद्र मोदींनी घेतली कोव्हॅक्सिन, मग आपण कोणती घ्यावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:58+5:302021-03-04T04:15:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सोमवारपासून (दि. १) सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Narendra Modi took covacin, so which one should we take? | नरेंद्र मोदींनी घेतली कोव्हॅक्सिन, मग आपण कोणती घ्यावी?

नरेंद्र मोदींनी घेतली कोव्हॅक्सिन, मग आपण कोणती घ्यावी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सोमवारपासून (दि. १) सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली, शरद पवार यांनी कोव्हिशिल्ड घेतली की कोव्हॅक्सिन यावरून सोशल मीडियावर खमंग चर्चा चालू झाली आहे. पंतप्रधानांनी घेतलेली लसच आपणही घ्यावी, या धारणेतून सोमवारी कोव्हॅक्सिनबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले.

तज्ज्ञांनी मात्र स्पष्टपणे हा संभ्रम दूर केला आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता मानवी चाचण्यांमध्ये सिद्ध झाली आहे. दोन्ही लसी सारख्याच परिणामकारक आहेत. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमित होण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

सिम्बायोसिस युनिर्व्हसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय नटराजन म्हणाले, “दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली आहे आणि मानवी चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शंका बाळगण्याचे कारण नाही. मात्र, कोणती लस जास्त चांगली, लाभदायक किंवा परिणामकारक अशा स्वरूपाचा अभ्यास अद्याप झालेला नाही. लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात वेग आल्यानंतर असा अभ्यास होऊ शकतो.”

मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख म्हणाले की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनबाबत जास्त प्रमाणात विचारणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही लसीमध्ये सुरक्षितता, परिणामकारकता आणि अर्थकारण हे मुद्दे महत्त्वाचे असतात. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. देशात दीड कोटीहून अधिक लसीकरण झाले आहे. कोणत्याच लसीचे वाईट परिणाम लक्षणीयरित्या समोर आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संभ्रम न बाळगता राष्ट्रीय कर्तव्य समजून लसीकरणासाठी पुढे यावे.

चौकट

सध्या भारतात पुण्याच्या सिरमची कोव्हिशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. ‘सिरम’ची लस ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन सिरममध्ये घेतले जाते. भारत बायोटेक तयार करत असलेली लस ही पूर्णत: भारतीय आहे. कोव्हिशिल्ड लस महापालिका रुग्णालयांमध्ये तर कोव्हॅक्सिन लस जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. मोदींनी कोव्हॅक्सिन लस घेतल्याने सोमवारी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका रुग्णालयांमध्येही त्याच लसीची मागणी केल्याचे समजते. सध्या कोव्हिशिल्ड लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

Web Title: Narendra Modi took covacin, so which one should we take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.