नसरापूर विकास पॅनलचा जोरदार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:30+5:302021-01-20T04:13:30+5:30
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर या गावची ग्रामपंचायत निवडणूक नेहमी अटीतटीच्या निवडणुकीसाठी सर्व परीचीत आहे. मात्र नसरापूर ग्रामस्थांच्या विचारातून ...
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर या गावची ग्रामपंचायत निवडणूक नेहमी अटीतटीच्या निवडणुकीसाठी सर्व परीचीत आहे. मात्र नसरापूर ग्रामस्थांच्या विचारातून यावेळी अकरा जागेपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. नसरापूर ग्रामपंचायतीच्या क्रमांक एक व चार प्रभागात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नसरापूर विकास पॅनलने निर्विवाद जोरदार विजय मिळविला आहे तर एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली आहे.
नसरापूर मधील प्रभाग क्रमांक दोन व तीन मधील निवडणूक बिनविरोध झाली होती याठिकाणी नसरापूर विकास पॅनलचे पाच उमेदवार या अगोदरच बिनविरोध विजयी झालेले आहेत.प्रभाग क्रमांक एक व चार मध्ये विकास पॅनल विरुद्ध नसरापूर जनशक्ती ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली होती.
प्रभाग क्रमांक एक मध्ये विजयी उमेदवार इरफान मुलाणी मते-३०४,सपना झोरे मते-३३१,अश्विनी कांबळे मते-३०३ हे नसरापूर विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
प्रभाग क्रमांक चार मध्ये विजयी उमेदवार गणेश दळवी मते-२८८,उषा कदम मते-३५६ हे नसरापूर विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले तर एका जागेवर मेघा लष्कर मते-३४९ या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत.
नसरापूर ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमी बहुचर्चित असल्यामुळे येथील निवडणुकीला राजकीय आख्याड्या ऐवजी या निवडणुकीतील पक्ष विरहीत राजकारणाला विशेष महत्त्व आहे.नसरापूर ग्रामपंचायत ही अकरा सदस्यीय आहे. यावेळी निवडणुकी पूर्वीच पाच जागा बिनविरोध आल्याने उर्वरीत सहा जागांसाठी निवडणूक झाली .दोन प्रभागातील या सहा जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात होते.यावेळी क्रमांक दोन व तीन वार्ड मधील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.त्यापैकी वार्ड क्रमांक दोन मधून शेटे रोहिणी अनिल, हाडके श्रद्धा संतोष, वाल्हेकर सुधीर सोपान व वार्ड क्रमांक तीन मधून कदम संदीप शंकर व चव्हाण नामदेव आत्माराम हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
नसरापूर विकास पॅनेलचे दहा विजयी उमेदवारांनी नसरापूर चे ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले.