उद्या भरणार नसरापूरचा आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:26+5:302021-03-14T04:11:26+5:30
गेल्या रविवारचा आठवडे बाजार नसरापूरसह पंचक्रोशीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन सूचनेवरून भरवला गेला नव्हता. शासनाने घातलेल्या अटीनुसार येथील दुकानदारांना ...
गेल्या रविवारचा आठवडे बाजार नसरापूरसह पंचक्रोशीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन सूचनेवरून भरवला गेला नव्हता. शासनाने घातलेल्या अटीनुसार येथील दुकानदारांना दुकाने खुली ठेऊन माल विक्रीसाठी परवानगी दिली होती.
या आठवड्यात या पंचक्रोशीतील कोरोणा बाधितांची कमी संख्या विचारात घेऊन परंतु सध्याची बाजाराची आर्थिक स्थिती पाहता तसेच नसरापूर व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार उद्याचा आठवडा बाजार हा अटी, शर्थीस आधीन राहून व कोरोना संदर्भात असलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर बाजार बाबत सकारात्मक विचार करून आठवडे बाजार भरताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दोन व्यापाऱ्यांच्या जागेमध्ये सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे,
एक दुकानात किंवा त्या जागेवर पाच पेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी असू नये तसेच जर गर्दी झालेली आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे,
प्रत्येक भाजीवाले व दुकानदार यांनी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.
दुकान समोर जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तसेच सॅनिटायझर वापर आढळून आला नाही तर त्या विक्रेत्याला शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामूळे वरिष्ठ पातळीवरून आलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक राहणार आहे.
दरम्यान, आठवडे बाजारात तसेच विना मास्क कोणी आढळल्यास असेल तर जागेवरच ५०० रू.दंड सक्तीने वसूल करून संबंधितावर कारवाई करणेत येणार आहे अशी माहिती नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविस्तार अधिकारी विजयकुमार कुलकर्णी यांनी दिली आहे.
सर्व व्यापारी व शेतकरी यांनी कोव्हिड - १९ संदर्भात असलेल्या नियमांचे काटेकोरपने पालन करावे अन्यथा नियमांचे पालन झाले नाही तर नाईलाजाने येणाऱ्या पुढील बाजार संदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नये.
- सरपंच , ग्रामपंचायत नसरापूर.