हिरव्या शालूंनी नटल्या डोंगररांगा

By admin | Published: July 29, 2014 11:05 PM2014-07-29T23:05:12+5:302014-07-29T23:05:12+5:30

पुणो जिल्ह्याच्या उत्तर आदिवासी भागात संततधार पाऊस सुरू आहे. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र, या पावसाने पूर्ण कसर भरून काढली.

Nathalia Mountain Range | हिरव्या शालूंनी नटल्या डोंगररांगा

हिरव्या शालूंनी नटल्या डोंगररांगा

Next
भीमाशंकर :  पुणो जिल्ह्याच्या उत्तर आदिवासी भागात संततधार पाऊस सुरू आहे. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र, या पावसाने पूर्ण कसर भरून काढली. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे डोंगर हिरवेगार झाले आहेत. डोंगरामधून पाण्याचे धबधबे वाहत आहेत. 
 पावसाने दडी मारल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने आदिवासी भागात भात पेरण्यांना सुरवात झाली आहे.  आदिवासी शेतकरी घोंगडय़ा पांघरून भात खाचरांत बैलांच्या साह्याने गाळ करताना दिसत आहेत. तर, महिला भात आवण्या करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंभीर झालेल्या पाण्याचा प्रश्न या पावसामुळे  काही अंशी मिटला आहे. काही वाडय़ा वस्त्यांवर अजुनही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. 
   शेतकरी हिरवळीवर आपली जनावरे चारत आहेत, असे सुंदर दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे.  हा सुंदर निसर्ग आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर, वेल्हा या तालुक्यांत निसर्ग बहरला आहे. येथील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक या भागात मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत.  (वार्ताहर)
 
पुणो : दुतर्फा झाडी, त्यातून जाणारी इवलिशी पाऊलवाट, पठार लागले, की नजर जाईल तेथवर हिरवा शालू पांघरून नटलेली भूमाता, मध्येच त्या हिरावाईला चिरत मनसोक्त बरसणारा धबधबा, उंचच उंच डोंगर रांगा, धस्स करणा:या कडा, धुक्याची झालर.. अशा विविध अंगाने बहरलेला निसर्ग पावसाळ्यात सगळ्यांनाच आकर्षित करत असला तरी गिर्यारोहकांना विशेष खुणावतो. त्यामुळेच गिर्यारोहकांची पावले अभेद्य गडांकडे वळू लागली आहेत. 
साचेबद्ध पर्यटनस्थळांपेक्षा द:याखो:यात विराजमान असलेल्या गडांकडे किंवा त्या भोवतालच्या निसर्गसौंदर्यात वसलेल्या ठिकाणांना नेहमी गिर्यारोहकांकडून पसंती दिली जाते. त्यातही पावसाळा म्हटला, की उत्साह द्विगुणीत झालेला असतो. 
थोडय़ा उशिराने का होईना वरुणराजाने आपली कृपादृष्टी केल्याने गिर्यारोहकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पावसाळा आला की साधारणपणो तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची, कर्नाळा, रायरेश्वर-केंजळगड, पेब, पेठ, पुरंदर, तिकोना, हरिश्चंद्रगड यांसह कार्ला केव्हज, तुंगर्ली लेक, वेल्हा परिसरातील वांगणी डोंगर अथवा कात्रज-सिंहगड अशा ठिकाणी गिर्यारोहणाचे नियोजन केले जाते. यंदाही याच ठिकाणांवर मोठय़ा प्रमाणावर गिर्यारोहकांचा ओढा पाहायला मिळत आहे.   मात्र गेल्या काही वर्षामध्ये कोणतीही माहिती नसताना गाईडविना धोकादायक ठिकाणी जाण्याचे ‘फॅड’ तरुणांमध्ये वाढत आहे, त्यामुळे काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे, या गोष्टी टाळण्यासाठी पावसाळ्यात गाईडशिवाय किंवा त्या ठिकाणची संपूर्ण माहिती असल्याशिवाय भटकंती करणो हे  धोकादायक असल्याचे  सतीश केळकर यांनी स्पष्ट केले आहे. 

 

Web Title: Nathalia Mountain Range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.