संघटनात्मक निवडीत राष्ट्रवादीत गटबाजी ?

By admin | Published: April 4, 2015 06:01 AM2015-04-04T06:01:10+5:302015-04-04T06:01:10+5:30

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक निवडणुका रविवारी होणार आहेत. मात्र, शहराध्यक्ष पदासाठी

National elections, grouping in NCP? | संघटनात्मक निवडीत राष्ट्रवादीत गटबाजी ?

संघटनात्मक निवडीत राष्ट्रवादीत गटबाजी ?

Next

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक निवडणुका रविवारी होणार आहेत. मात्र, शहराध्यक्ष पदासाठी
इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावली असून, त्यामुळे निवडीत गटबाजी होण्याची
शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष व खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना सलग सहा वर्षे संधी मिळाली आहे. राज्यसभा खासदारपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे बोलून
दाखविली होती. परंतु, संघटनात्मक निवडीच्या प्रक्रियेनंतर शहराध्यक्ष निवड होणार आहे. त्यासाठी
प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार
अनिल भोसले, सभागृहनेते सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील
व नगरसेवक अप्पा रेणुसे यांची
नावे चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शहरातील आठही मतदार संघांच्या अध्यक्षपदाच्या निवडीत समर्थकांची वर्णी लावण्यासाठी इच्छुकांची तयारी
सुरू आहे.
प्रत्येक मतदार संघात वेगवेगळ्या गटाचे समर्थक आमने-सामने येणार असल्याने गटबाजी होण्याची
शक्यता आहे. मुंबईचे हरिश सणस हे प्रमुख निवडणूक निरीक्षक असून, मतदार संघनिहाय वेगळ्या निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

Web Title: National elections, grouping in NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.