राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा : आदर्श मित्र मंडळाला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:53 AM2018-08-28T02:53:10+5:302018-08-28T02:53:37+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

National Ganesh Utsav Tournament: Adarsh ​​Mitra Mandalan First Number | राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा : आदर्श मित्र मंडळाला प्रथम क्रमांक

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा : आदर्श मित्र मंडळाला प्रथम क्रमांक

googlenewsNext

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने चौथे तर कर्वेनगर येथील स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित यांनी पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १८७ मंडळांपैकी ८६ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टच्या वतीने एकूण ११ लाख ३९ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत आदर्श मित्र मंडळाच्या जलसंवर्धन काळाची गरज आणि शेतकरी कर्जमाफी या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या सर्जिकल स्ट्राईक या देखाव्यास ४५ हजारांचे, काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या काल्पनिक गणेश मंदिराला ४० हजारांचे, महाराष्ट्र तरुण मंडळाच्या सैनिक हो तुमच्यासाठी या देखाव्याला ३५ हजारांचे आणि स्वतिश्री गृहरचना संस्थेच्या पंचतत्त्वांचा पर्यावरणपूरक समतोल या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
केरळमधील पीडितांना मदत करण्याविषयी गोडसे यांना विचारले असता ते म्हणाले, की केरळ येथील पीडितांना मदत करण्यासाठी मंडळ अग्रेसर राहणार असून शहरातील अनेक मंडळांना या उपक्रमात सहभागी करून घेणार आहोत. गणेशोत्सवानंतर या संदर्भात बैठक आयोजित करून त्याविषयी निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, विजय चव्हाण, अनिल घाणेकर, राजन काळसेकर, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, मोहन शेटे यांसह सहायक म्हणून चिंतामणी काळे, ओंकार वाघ, कमलेश खिंवसरा, वृषभ अंबिके, ॠषिकेश धनवडे, दीप राणे यांनी काम पाहिले.

इतर निकाल
१ पश्चिम विभाग : विनायक नवयुग मित्र मंडळ (प्रथम), संगम तरुण मंडळ (द्वितीय), त्रिदल गणेश मंडळ (तृतीय). सोसायटी गणेशोत्सव -श्रीराम मित्र मंडळ. सांस्कृतिक देखावे - भैरवनाथ तरुण मंडळ, गोखले स्मारक मित्र मंडळ. काल्पनिक देखावे - नवजवान मित्र मंडळ, श्रीकृष्ण मंडळ, मुठेश्वर मित्र मंडळ. सजीव देखावे-आझाद मित्र मंडळ, समस्त गावकरी मंडळ, एकी तरुण मंडळ, श्री साई मित्र मंडळ. धार्मिक व पौराणिक देखावे-नवभूमी तरुण मंडळ, संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ. सामाजिक कार्य (बक्षीसपात्र)-श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ.
२ पूर्व विभाग :-पौराणिक देखावे-विहार मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ. काल्पनिक देखावे (बक्षीसपात्र)-अखिल गणेश बाग मित्र मंडळ.

३ उत्तर विभाग : आदर्श तरुण मंडळ (प्रथम), गवळीवाडा तरुण मंडळ (द्वितीय), दि नॅशनल यंग क्लब (तृतीय). काल्पनिक देखावे (बक्षीसपात्र)-फ्रेंडशिप क्लब. सांस्कृतिक देखावे - दर्शक तरुण मंडळ, समृद्धी गणेशोत्सव मंडळ. सजीव देखावे-नवज्योत मित्र मंडळ. सोसायटी (बक्षीसपात्र) - राम सोसायटी.
४ दक्षिण विभाग : साईनाथ मित्र मंडळ (प्रथम), महेश सोसायटी मित्र मंडळ (द्वितीय), वनराई कॉलनी मित्र मंडळ (तृतीय). सजीव देखावे-दर्शन मित्र मंडळ, गणेश सेवा तरुण मंडळ. काल्पनिक देखावे-नवनाथ मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ. सांस्कृतिक देखावे - लोकमान्य मित्र मंडळ, आझादनगर मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ. सोसायटी-युगंधर मित्र मंडळ, सुंदर गार्डन मित्र मंडळ.

Web Title: National Ganesh Utsav Tournament: Adarsh ​​Mitra Mandalan First Number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.