पुण्यामध्ये राष्ट्रीय दुखापत प्रतिबंध सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:14 AM2021-09-07T04:14:06+5:302021-09-07T04:14:06+5:30
पुणे : स्पायनल कॉर्ड सोसायटी, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन (आयओए), असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडिया (एएसएसआय) आणि इंडियन स्पायनल ...
पुणे : स्पायनल कॉर्ड सोसायटी, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन (आयओए), असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडिया (एएसएसआय) आणि इंडियन स्पायनल इंज्युरिज सेंटर (आयएसआयसी) यांनी अशाच इतर दहा संघटनांसोबत मिळून भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या (डीजीएचएस) सहयोगाने पहिल्या राष्ट्रीय दुखापत प्रतिबंध सप्ताहाचे आयोजन केले आहे. दर वर्षी शहरातील हजारो जणांचे जीव वाचवण्यात मोलाचे योगदान देऊ शकेल असा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीसह देशभरातील १० शहरांमध्ये सुरू केलेला राष्ट्रीय दुखापत प्रतिबंध सप्ताह ७ सप्टेंबरपर्यंत चालेल. शिक्षण, संशोधन आणि समर्थन यामार्फत दुखापत प्रतिबंधाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.