म्हाडाचे सीईओ नितीन माने-पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 08:43 PM2022-04-08T20:43:14+5:302022-04-08T20:43:48+5:30
पुणे : कोरोना संकटात ख-या अर्थाने सर्वसामान्य व गोरगरिब लोकांना आधाराची गरज असताना पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ( ...
पुणे : कोरोना संकटात ख-या अर्थाने सर्वसामान्य व गोरगरिब लोकांना आधाराची गरज असताना पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार व सतत पाठपुरावा करत एकाच वर्षात तब्बल 12 हजारांहून अधिक लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. त्याच्या कार्याची दखल घेत कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल च्या वतीने (सीआयडीसी) राष्ट्रीय पातळीवरील ‘सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार 2022 हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे गुरुवार (दि.8) रोजी झालेल्या 26 व्या वार्षिक दिन महोत्सवात माने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ‘सीआयडीसी’चे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.
नीती आयोगाने इंडियन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच्या समवेत कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट कौन्सिलची (सीआयडीसी) निर्मिती केली आहे. हे राष्ट्रीय पातळीवरील एक उच्च मंडळ असून, भारतीय बांधकाम उद्योग क्षेत्रात चांगल्या योजना कार्यान्वित करण्याच्या काम ते करत आहे. बांधकाम उद्योगाची वाढ व विकास व्हावा या उद्देशाने ‘सीआयडीसी’ने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी ‘सीआयडीसी विश्वकर्मा’ पुरस्कार सुरू केला आहे.