रांजणगाव येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:01+5:302021-09-12T04:14:01+5:30

यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना वायाळ, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी राष्ट्रीय पोषण आहार ...

National Nutrition Campaign at Ranjangaon | रांजणगाव येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान

रांजणगाव येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान

Next

यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना वायाळ, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी राष्ट्रीय पोषण आहार अभियान या उपक्रमांतर्गत पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी विविध उपक्रमांबाबत जनजागृती होण्यासाठी गावातून हातात फलक घेऊन प्रभातफेरी काढली. स्वाती पाचुंदकर याही प्रभात फेरीत सहभागी झाल्या होत्या.

स्वाती पाचुंदकर म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत महिलांसाठी सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा.

पर्यवेक्षिका मीना वायाळ यांनी राष्ट्रीय पोषण आहार अभियान या उपक्रमाबाबत महिलांना सविस्तर माहिती दिली. मुलीचा जन्मदर वाढविणे, बालविवाह रोखणे, महिला दक्षता समिती कार्यक्रम राबविणे, आहार मार्गदर्शन, पुरक पोषण आहार, कोवीड लसीकरण जनजागृती, किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा मातांना आहार मार्गदर्शन, पालक मेळावा, बेटी बचावो, बेटी पढाओ, माझी कन्या माझी भाग्यश्री, कुपोषण, सजग पालक सुदृढ बालक, महिला शेतकरी मेळावा, वृक्षारोपण, महिला बचत गट मेळावा, विविध स्पर्धा आदी उपक्रम या सप्टेंबर महिन्यात राबविण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

११ रांजणगाव गणपती

अंगणवाडी पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी काढलेली प्रभात फेरी.

Web Title: National Nutrition Campaign at Ranjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.