वाघीरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:51+5:302021-08-29T04:13:51+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन सासवड शहराचे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरांदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी सुप्रिया ...
कार्यक्रमाचे उद्घाटन सासवड शहराचे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरांदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी सुप्रिया दुरांदे यांचे स्वागत केले व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
फिटनेस राहण्यासाठी डायट, हर्बल लाईफचा अंगीकार करण्यापेक्षा व्यायाम करून तंदुरुस्त राहा. असा संदेश सुप्रिया दुरांदे यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी महाविद्यालयाचे क्रीडांगण व जिमखाना यांचा वापर करून क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
“मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्णपदक मिळवून दिले. ड्रीब्लिंग या कौशल्यामध्ये चेंडू आणि हॉकी स्टिकचा चपळाईने वापर त्यांनी केला. त्यांनी भारतीय हॉकीला मानाचे स्थान मिळवून दिले. प्रास्ताविकात प्रा. ऋषिकेश कुंभार यांनी माहिती दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. ऋषिकेश कुंभार, प्रा. दिलीप गरुड, प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. सुनीता भगवान, डॉ. नाना झगडे, डॉ. संजय झगडे, डॉ. शीतल कल्हापुरे, प्रा. सुनील शिंदे, कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.