पुण्यातील एमआयटीमध्ये १० ते १२ जानेवारी दरम्यान भरणार ‘नॅशनल टिचर्स काँग्रेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:17 PM2018-01-02T19:17:12+5:302018-01-02T19:20:22+5:30
एमआयटीच्यावतीने दुसऱ्या नॅशनल टिचर्स काँग्रेसचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत कोथरुड येथील एमआयटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे : एमआयटीच्यावतीने दुसऱ्या नॅशनल टिचर्स काँग्रेसचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत कोथरुड येथील एमआयटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे.
नॅशनल टीचर्स काँग्रेसचे प्रमुख निमंत्रक प्रा. राहुल कराड, प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, प्राचार्य महासंघाचे महासचिव डॉ. सुधाकरराव जाधवर, प्रा. जय गोरे व अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस यांनी नॅशनल कॉन्फरन्सबाबत माहिती दिली. या परिषदेमध्ये देशभरातून ८,००० प्राध्यापक सहभागी होणार आहेत. या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी, तर समारोप शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. तीन दिवसीय परिषदेत एकूण सात सत्रे ठेवण्यात आली आहेत.
भारतातील उच्च शिक्षण : आढावा आणि भावी दिशा, उच्च शिक्षणातील गुणवत्ता- सत्य आणि सामोपचार, उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग- फायदे विरूद्ध अडथळे,शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षणाचे अर्थशास्त्र आदी विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, डॉ. ए.बी. देशपांडे, डॉ. ए.के. सेन गुप्ता, डॉ.अनिल के गुप्ता, डॉ.अनिल माहेश्वरी, डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, शास्त्रज्ञ डॉ.सीएनआर राव, डॉ.देवी सिंग, डॉ.दिलीप रांजेकर, न्यायमूर्ती हेगडे, डॉ.एन.एम.कोंडप, डॉ. मनिष कुमार आदी मान्यवर या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.