शेतकऱ्याचा मुलगा बनला राष्ट्रीय वेटलिफ्टर

By admin | Published: October 21, 2015 12:47 AM2015-10-21T00:47:40+5:302015-10-21T00:47:40+5:30

तो शेतकरी कुटुंबातील... घरची परिस्थिती तशी बेताची; पण शेतीत राबताना त्या मातीनेच त्याला जगण्याचे बळ आणि आयुष्याचे ध्येय दिले आणि जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या बळावर

The national weightlifter became the farmer's son | शेतकऱ्याचा मुलगा बनला राष्ट्रीय वेटलिफ्टर

शेतकऱ्याचा मुलगा बनला राष्ट्रीय वेटलिफ्टर

Next

शेळपिंपळगाव ते टोकिओ :काळ्या मातीनेच दिले जगण्याचे बळ

शेलपिंपळगाव : तो शेतकरी कुटुंबातील... घरची परिस्थिती तशी बेताची; पण शेतीत राबताना त्या मातीनेच त्याला जगण्याचे बळ आणि आयुष्याचे ध्येय दिले आणि जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या बळावर तो वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर झळकला. इतकेच नवे त्याने भारताला रौप्यपदकही मिळवून दिले. हा जिगरबाज तरुण म्हणजे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा हर्षद सुभाष वाडेकर.
नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. त्यामुळे त्याचे नाव आता सर्वत्र झळकत आहे. त्याच्या जडणघडणीचा प्रवास आणि त्याची वाटचाल समजून घ्यावी, यासाठी त्याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
शेलपिंपळगाव (ता. खेड) या गावात जन्मलेल्या हर्षदचे शिक्षण तिथल्याच श्री शिवाजी विद्यालयात झाले. सुरुवातीला त्याला आवड होती कबड्डीची. जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर तो गोळाफेकीकडे वळला. काही दिवसांतच वेटलिफ्टिंग खेळाकडे आकर्षित झाला. एकाच खेळावर लक्ष केंद्रित न करणाऱ्या हर्षदचा कान एक दिवस त्याच्या वडिलांनीच धरला. तुला आवडणाऱ्या एकाच खेळाची तू निवड कर आणि त्याच खेळावर लक्ष दे, असा सल्ला मिळाल्यानंतर हर्षदने वेटलिफ्टिंगला पसंती दिली.
२०११ मध्ये वेटलिफ्टिंगच्या सरावाला कसून सुरुवात केली अन् विभागस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या खेळाची छाप पाडली. त्यानंतर दोनदा तो राज्यस्तरीय स्पर्धेत अयशस्वी ठरला. सांगलीत पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत २४६ किलो वजन उचललेल्या हर्षदची पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. हरियाणात झालेल्या स्पर्धेत हर्षदने चुणूक दाखविल्याने पतियाळा येथे सहा महिने प्रशिक्षण घेतले. बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ९४ किलोगटात दोन प्रकारांत एकूण ३०५ किलो वजन उचलून त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
खेळात प्राविण्य मिळवून देशाचे नाव उज्वल करावे, अशी आशा त्याचे वडील सरपंच सुभाष वाडेकर यांना आहे. (वार्ताहर)

Web Title: The national weightlifter became the farmer's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.