राष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:03+5:302021-06-22T04:08:03+5:30
नमस्कार घालून राष्ट्रीय योग दिन कोरोना नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भोर शहरातील कोंढाळकर हाईट्स येथे ...
नमस्कार घालून राष्ट्रीय योग दिन कोरोना नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भोर शहरातील कोंढाळकर हाईट्स येथे कोरोना नियमांचे पालन करून राष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. या वेळी
नंदकुमार देवी, अनुराधा देवी, शहाजी लगड, रवींद्र कोंढाळकर, डाॅ. आनंद कंक, सुनीता लगड, प्रमोद सुपेकर, सुनीता लगड
योगेश शेडगे, निर्मला किंद्रे, डाॅ. जान्हवी क्षीरसागर, रुपाली भेलके
सारिका कोंढाळकर, सुर्वणा शिंदे, सागर शेटे, डाॅ. आण्णासाहेब बिराजदार, निलिमा शिवतरे उपस्थित होते. नंदकुमार देवी यांनी भारतीय योग विद्याधाम शाखेच्या कामाची व योग दिनाबाबत माहिती दिली, तर अनुराधा देवी यांनी योग दिनानिमित्ताने योगसाधक व योगशिक्षक यांच्याकडून योगासनांची प्रत्याक्षिके करून घेतली. डाॅ. आनंद कंक यांनी योगदिनानिमित्त योग विषयावर कीर्तन करून योगसाधकांचे प्रबोधन केले.
योगदिनाच्या निमित्ताने १५१ सूर्यनमस्कार घालण्याचे आयोजन ऑनलाईन वर्ग घेऊन करण्यात आले. सदरचा ऑनलाईन वर्ग योगशिक्षक निर्मला किंद्रे व गणेश जाधव यांनी घेतला. या वेळी अनेक साधक सहभागी झाले होते.
आभार प्रा. शहाजी लगड यांनी मानले.