'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील; बारामतीत भाजपचं जिंकणार', चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:11 PM2022-09-06T12:11:47+5:302022-09-06T12:12:02+5:30

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान

Nationalist activists will join BJP BJP will win in Baramati Chandrasekhar Bawankule | 'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील; बारामतीत भाजपचं जिंकणार', चंद्रशेखर बावनकुळे

'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील; बारामतीत भाजपचं जिंकणार', चंद्रशेखर बावनकुळे

Next

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बाबी जनतेला पटत नाहीत. त्यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून अनेकजण भाजप मध्ये प्रवेश करतील. यंदा संपुर्ण देशात ४०० पेक्षा अधिक, तर राज्यात बारामतीसह सर्व लोकसभेच्या भाजपच्या जागा निवडुन येतील. बारामती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे. बारामतीची लढाई जिंकण्यासाठी लढणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात आजपर्यंत अशी राजकीय लढत झालेली नाही. त्यामुळे या राजकीय लढतीपैकी २०२४ ची लढाई सर्वात प्रभावी असेल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले. बावनकुळे हे मंगळवारी पुर्ण दिवस बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

बावनकुळे म्हणाले, आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, आम्ही संन्याशी नाही. भाजप राज्यातील सर्व ठिकाणी निवडणुक लढणार आहे. कार्यकर्त्यांना ताकत देण्याची आमची जबाबदारी आहे. देशातील भाजप एक क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीत देखील आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भुमिका आहे. त्याबाबतची तयारी आमची असणार आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नसून आमचा ‘क्लीअर अजेंडा’ भाजप—सेना युती बारामतीत जिंकेल, भाजप कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

दोन महिन्यात संपुर्ण राज्यात दौरा करणार आहे. पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी करणार आहे. देशात ४०० पेक्षा अधिक, राज्यात ४५ अधिक लोकसभा आणि बारामतीसह २०० पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा संघटन शक्तीच्या बळावर प्रचंड ताकतीने निवडुन आणणार.जनता धोकेबाजांना बाजुला करुन हिंदुत्वाचे खरे रक्षण करणाऱ्यांना जनता मदत करेल, असा विश्वास आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना आणि देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

बारामतीचा बालेकिल्ला मानाने फारसा मोठा नाही 

देशात बडे राजकीय किल्ले उद्धवस्त झाले आहेत. त्यात काही मोठे नसून उपेक्षित लोकांसाठी भाजप काम करत आहे. देशात जनता निर्णय घेते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच केवळ देश मजबुत करु शकतात. हे जनतेला समजल आहे. त्यामुळे देशात अनेक राजकीय किल्ले उध्द्वस्त होतील. त्यामुळे बारामतीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानाने फारसा मोठा नसल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. यावेळी आमदार राहुल कुल,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,बाळासाहेब गावडे,वासुदेव काळे,रंजन तावरे,अविनाश मोटे,पांडुरंग कचरे आदी उपस्थित होते.

Web Title: Nationalist activists will join BJP BJP will win in Baramati Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.