राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल यांचा राजीनामा
By admin | Published: October 21, 2014 05:21 AM2014-10-21T05:21:29+5:302014-10-21T05:21:29+5:30
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून योगेश बहल यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून योगेश बहल यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत पिंपरी, भोसरी आणि चिंचवड हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, तर एक राष्ट्रवादीचा व दोन संलग्न आमदार या मतदारसंघातून होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. त्यात राष्ट्रवादीचा तीनपैकी एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बहल यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे. महापालिकेत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असताना अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला. शहराध्यक्ष या नात्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अपयशाबद्दल राजीनामा देत आहे, असे बहल यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)