नटराज पॅनेलचा टिळक स्मारक मंदिराबाहेर गुलाल उधळून जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:38 AM2018-10-08T00:38:39+5:302018-10-08T00:39:01+5:30

समस्त नाट्य वर्तुळाचे लक्ष लागलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नटराज पॅनेलने विजयावर आपली एकहाती मोहोर उमटवली.

Natraj pannel win election of akhil bharatiy marathi natya parishad's pune branch | नटराज पॅनेलचा टिळक स्मारक मंदिराबाहेर गुलाल उधळून जल्लोष

नटराज पॅनेलचा टिळक स्मारक मंदिराबाहेर गुलाल उधळून जल्लोष

Next

पुणे : समस्त नाट्य वर्तुळाचे लक्ष लागलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नटराज पॅनेलने विजयावर आपली एकहाती मोहोर उमटवली. या निवडणुकीत, पतंगच उंच उंच उडला. पॅनेलचे सर्व 19 उमेदवार निवडून आले. रंगधर्मी , नटराज आणि लोकमान्य अशी तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती, परंतु खरी लढत रंगधर्मी आणि नटराज या पॅनेल मध्ये होईल अशी चर्चा निवडणुकीदरम्यान ऐकायला मिळत होती, मात्र मतमोजणी मध्ये पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत नटराज पॅनेल आघाडी राहिले. 

टिळक स्मारक मंदिर येथे रविवारी बारापर्यंत मतमोजणी सुरू होती. पुणे शाखेच्या 19 जागांसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.  सकाळी ते दुपारी चारपर्यंत एकूण 811 इतके मतदान झाले. त्यानंतर मतमोजणीस सुरूवात झाली. मतमोजणीसाठी दहा टेबल मांडण्यात आली होती. तरीही निकाल लागण्यास रात्रीचे बारा वाजून गेले. अखेर नटराज पॅनेल निवडणुकीत विजयी झाले.

मेघराज राजे भोसले, विद्यमान अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, प्रकाश पायगुडे, जयमाला इनामदार, रजनी भट, वृषाली कुलकर्णी असे नटराज पॅनेलचे सर्वच 19 उमेदवार निवडून आले. जयमाला इनामदार यांना अधिक मते पडली. माजी अध्यक्ष सतीश देसाई यांच्या रंगधर्मी आणि प्रदीपकुमार कांबळे यांच्या ' लोकमान्य' पॅनेलला हार पत्करावी लागली.

Web Title: Natraj pannel win election of akhil bharatiy marathi natya parishad's pune branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.