तापमानवाढ रोखण्यासाठी निसर्गसंवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:51+5:302021-06-16T04:12:51+5:30

ॲड. वंदना चव्हाण : पर्यावरण सप्ताहाचा समारोप पुणे : “वाढते शहरीकरण, विकासकामांच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, काँक्रिटीकरण आणि टेकड्यांचा ऱ्हास ...

Nature conservation is essential to prevent global warming | तापमानवाढ रोखण्यासाठी निसर्गसंवर्धन आवश्यक

तापमानवाढ रोखण्यासाठी निसर्गसंवर्धन आवश्यक

Next

ॲड. वंदना चव्हाण : पर्यावरण सप्ताहाचा समारोप

पुणे : “वाढते शहरीकरण, विकासकामांच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, काँक्रिटीकरण आणि टेकड्यांचा ऱ्हास तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे. ही तापमानवाढ रोखायची असेल तर निसर्गसंवर्धन आवश्यक आहे,” असे मत राज्यसभा खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्या वतीने आयोजित पर्यावरण सप्ताहाच्या समारोपावेळी चव्हाण बोलत होत्या. ‘जागतिक तापमानवाढ रोखण्यात नागरिक व स्वयंसेवी संस्थांची भूमिका’ या विषयावर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी ‘लायन्स’चे प्रांतपाल सीए अभय शास्त्री, पर्यावरण सप्ताहाचे समन्वयक अनिल मंद्रुपकर आदी उपस्थित होते.

पर्यावरण सप्ताहामध्ये ‘नो व्हेईकल डे’, बत्ती गुल (एक तास दिवे बंद करून वीजबचत), प्रभाकर तावरे पाटील यांचे टेरेस गार्डनवर मार्गदर्शन, शामला देसाई यांचे कचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन, वृक्षारोपण, गोशाळा पाहणी आदी उपक्रम राबविण्यात आले. सप्ताहाच्या आयोजनात लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स, लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम, लायन्स क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर, लायन्स क्लब ऑफ पुणे विस्डम, लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभात, लायन्स क्लब ऑफ नाशिक पंचवटी, लायन्स क्लब ऑफ पुणे नवचैतन्य, लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूड आदी सहभागी झाले होते. मयूर बागुल यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र टिळेकर यांनी आभार मानले.

Web Title: Nature conservation is essential to prevent global warming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.