नारायणगावच्या तमाशा पंढरीला यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:28 AM2018-03-19T00:28:17+5:302018-03-19T00:28:17+5:30

लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कला पंढरीत गुढीपाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ यांची झालेली गर्दी पाहता नारायणगाव येथील या तमाशा पंढरीत यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Nature of Yatra in Tamasha Pandari of Narayangaon | नारायणगावच्या तमाशा पंढरीला यात्रेचे स्वरूप

नारायणगावच्या तमाशा पंढरीला यात्रेचे स्वरूप

googlenewsNext

नारायणगाव : लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कला पंढरीत गुढीपाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ यांची झालेली गर्दी पाहता नारायणगाव येथील या तमाशा पंढरीत यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवारी जवळपास २००हून अधिक तमाशा कार्यक्रमांच्या सुपाºया गेल्या. साधारणपणे २ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल झाली.
लोकनाट्य तमाशासाठी गुढीपाडव्याचा शुभदिवस मानला जातो. तमाशा पंढरीत रविवारी दिवसभरात २००हून अधिक सुपाºया तमाशा खेळाच्या गेल्या. जवळपास अडीच कोटी रुपयांची उलाढाल या तमाशा पंढरीत झाली़ अडीच महिन्यांच्या कालावधीत मा. आ. वल्लभ बेनके तमाशा पंढरीत ३५० तमाशा खेळांचे बुकिंग होऊन सुमारे ५ कोटींची उलाढाल होईल, अशी माहिती लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव आणि तमाशा फडमालक बाळ अल्हाट यांनी दिली़ लोकनाट्य तमाशा फडमालकांच्या दृष्टीने गुढीपाडवा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुढीपाडव्याचे औचित्य साधून नारायणगाव येथील तमाशा पंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच नगर, नाशिक, ठाणे या भागातील गावकºयांची रेलचेल सुरु असते. याठिकाणी जणू जत्राच येथे भरली जाते़. आपल्या गावातील यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशाची सुपारी देण्यासाठी गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ येथील ३२ राहुट्यांमध्ये आले होते. दिवसभरात २०० हून अधिक तमाशा कार्यक्रमांच्या सुपाºया गेल्या. साधारणपणे आजच्या दिवशी २ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल या तमाशा पंढरीत झाली़
प्रत्येक फडमालकांना दिवसभरात ७ ते १० सुपाºया मिळाल्या. सर्वच फडमालकांना हे वर्ष चांगले गेले़ तमाशा फडमालकांच्या दृष्टीने पौर्णिमा, कालष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असून, या तारखांना लोकनाट्य तमाशा खेळाची सुपारी सर्वाधिक किमतीची मिळते़ तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांची पौर्णिमा ३ लाख ४० हजारास चिखली, पुणे येथे तर मंगला बनसोडे यांची कालष्टमीची सुपारी २ लाख ८० हजारास तळेगाव ढमढेरे या गावास गेली. रघुवीर खेडकर यांची २ लाख ७५ हजारास कालष्टमी काळवाडी, पुणे या गावास तर पौर्णिमा सोमाटणे गावास या सुपाºया गेल्या. चंद्रकांत ढवळपुरीकर यांची पौर्णिमा सुपारी २ लाख ५१ हजारास, अंजली नाशिककर यांची कालष्टमी सुपारी २ लाख १ हजार रुपयास गेली, भिका- भीमा सांगवीकर यांची पौर्णिमा २ लाख ७५ हजारास, तर कालष्टमी २ लाख ७१ हजारास, काळू-बाळू यांची पौर्णिमा सुपारी १ लाख ७५ हजार गेली.
महाराष्ट्राची लोककला असलेल्या लोकनाट्य तमाशा पंढरीत तमाशा खेळाची सुपारी देण्यासाठी पुणे, नगर, ठाणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांतील ग्रामस्थ, गावकरी, पंच कमिटी, यात्रा उत्सव कमिटी, पुढारी यांची नारायणगावच्या तमाशा पंढरीत गर्दी झाली होती़ तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गाणी किती होणार याची प्रामुख्याने विचारणा गाव पुढाºयांकडून होत होती. नारायणगाव येथे तमाशा फडाच्या ३२ राहुट्या आहेत़ एका राहुटीत साधारणपणे १० ते १५ सुपाºया बुक झालेल्या आहेत़ मोठ्या फडाच्या सुपाºया जवळजवळ बुक झालेल्या आहेत़ सरासरी सर्व फडांचे ९० टक्के बुकिंग झालेले आहे़ मध्यम व छोट्या फडांनादेखील यावर्षी चांगली मागणी आहे, अशी माहिती तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे लोकनाट्य तमाशाफडाचे मालक आविष्कार मुळे यांनी दिली़

Web Title: Nature of Yatra in Tamasha Pandari of Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.