नऊवारी साडी अन् नाट्य संमेलनाची रॅली भारी; शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ

By श्रीकिशन काळे | Published: January 5, 2024 02:29 PM2024-01-05T14:29:00+5:302024-01-05T14:29:47+5:30

पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीड़ा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य शोभायात्रा

Nauvari saree and theater gathering rally heavy Inauguration of 100th All India Marathi Theater Conference | नऊवारी साडी अन् नाट्य संमेलनाची रॅली भारी; शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ

नऊवारी साडी अन् नाट्य संमेलनाची रॅली भारी; शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ, संत गाडगेबाबा महाराज, साईबाबा यांची वेशभूषा आणि नाटकांमधील पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील अजरामर अशा १०० कलाकृती मधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा... अशा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी (दि.५) सकाळी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभानिमित्त रथयात्रा काढण्यात आली.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीड़ा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढली. त्यामध्ये शेकडो दुचाकी, दहा रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या १०० व्यक्तिरेखांचा समावेश होता. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, नाटय परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे शाखेचे विजय पटवर्धन, रजनी भट, जयमाला इनामदार, दीपक रेगे, माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, गिरीश ओक ,शोभा कुलकर्णी, अभिजित बिचुकले यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ही रथयात्रा आणि बाईक रॅली गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोहचली, त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज (शुक्रवार) होणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर चारूदत्त आफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाट्य संकीर्तन सादर केले. तसेच डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठान प्रस्तुत बहुरूपी भारूड यावर डॉ. भावार्थ देखणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम सादर केला. दुपारी ‘नाटक माझ्या चष्म्यातून हे नाटक दाखविण्यात आले.

Web Title: Nauvari saree and theater gathering rally heavy Inauguration of 100th All India Marathi Theater Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.