Navale Bridge Accident: उतार कमी करणार! अपघात रोखण्यासाठी सल्लागाराची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:56 AM2022-11-22T09:56:02+5:302022-11-22T09:59:24+5:30

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली

Navale Bridge Accident Will reduce the slope of road Appointment of consultant for accident prevention | Navale Bridge Accident: उतार कमी करणार! अपघात रोखण्यासाठी सल्लागाराची नेमणूक

Navale Bridge Accident: उतार कमी करणार! अपघात रोखण्यासाठी सल्लागाराची नेमणूक

googlenewsNext

- कल्याणराव आवताडे

धायरी (पुणे) : स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल हे सहा किलोमीटरहून अधिक अंतर आहे. मागील आठ वर्षांत येथे १८५ हून अधिक अपघात झाले असून, यात ६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तीव्र उतार हेच येथील अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आल्याने स्वतंत्र समिती नेमून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी केले जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी (दि. २०) भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेतले गेले. अनेक अपघाताच्या घटनांचा अभ्यास केला असता, वाहनचालकांची चुकी, ब्रेक फेल, अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशीच कारणे समोर येतात. बऱ्याचवेळेला काही अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी वाहन ‘न्यूट्रल’ किंवा इंजिन बंद करून या उतारावरून चालवीत असतात. अचानकपणे इतर वाहने समोर आल्यास चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो अन् विचित्र अपघात घडतो.

महामार्गावर इतर ठिकाणीही उतार असतो. मात्र, या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. याच भागात सातत्याने अपघात का घडतात व अपघात रोखण्यासाठी त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. ‘लोकमत’शी बाेलताना संजय कदम यांनी माहिती दिली.

येथेच अपघात का हाेतात?

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा परिसर तीव्र उताराचा आहे. हा नैसर्गिक उतार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दृष्टीने नियमाप्रमाणे टेकडी भागाचा उतार आहे. हा उतार साधारणत: ४.३ टक्के ग्रेडियंट आहे. बऱ्याच वेळेला काही वाहनचालक बेशिस्तपणे, वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालवीत असल्याने सतत अपघात घडत असल्याचे मागील घटनांवरून दिसून येते, असे संजय कदम म्हणाले.

अपघात राेखण्यासाठी हे करणार

- परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेऊन महामार्गावर अधिकची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला आहे. महामार्गातही आवश्यक ते बदल करू. यात तांत्रिक समितीचा अभ्यास करून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी करता येईल.

उड्डाण पुलाचाही पर्याय

- मुळात हे काम बीओटी तत्त्वावर आहे. यात आम्हालाही बऱ्याच समस्या आहेत. तांत्रिक समितीचा अहवाल आल्यानंतर सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. साधारणत: तीन महिन्यांमध्ये यावर निर्णय होईल. त्यानंतर कामास सुरुवात होईल. यामध्ये उतार कमी करायचा की उड्डाणपूल करायचा, याबाबत नेमलेल्या स्वतंत्र सल्लागार, समितीच्या अहवालानंतरच ठरविण्यात येईल, असेही संजय कदम म्हणाले.

Web Title: Navale Bridge Accident Will reduce the slope of road Appointment of consultant for accident prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.