नौकासन - निरामय पान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:40+5:302021-07-05T04:08:40+5:30
या आसनात शरीराचा आकार पाण्यात तरंगणाऱ्या नौकेसारखा होतो. म्हणून याला नौकासन म्हणतात. हे आसन पाठीवर आणि पोटावर झोपून दोन ...
या आसनात शरीराचा आकार पाण्यात तरंगणाऱ्या नौकेसारखा होतो. म्हणून याला नौकासन म्हणतात. हे आसन पाठीवर आणि पोटावर झोपून दोन प्रकारे केले जाते. नियमित या आसनाच्या सरावामुळे पाठीच्या आणि पोटाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो. मेरूदंडसुद्धा मजबूत होतो.
कृती - पाठीवर केले जाणारे आसन
- प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही हात शरीराला समांतर ठेवावेत. श्वास सोडत पाय, मस्तक व धड हळूहळू वर उचलावे. शरीराचा आकार आकृतीत दाखविल्याप्रमाणे तोलून धरावे. १० ते १५ सेकंद स्थितीत राहावे. नंतर आधी पाय धड आणि डोके हळूहळू खाली टेकवावे.
फायदे -या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो. पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते. माड्यांच्या स्नायूंना व्यायाम मिमळाल्यामुळे ते सुदृढ होतात. आसनाच्या नियमित सरावाने हर्नियासारखे आजार होत नाहीत.
कृती - पोटावर केले जाणारे आसन
- पोटावर झोपावे, हात पुढे सरळ लांब ठेवावेत. हाताचे पंजे जमिनीवर चिकटून ठेवावे. हलकासा श्वास घेत शलभासनासारखे दोन्ही पाय वर उचलावे. त्यासोबत दोन्ही हात डोके, छाती हळूहळू वर उचलावी. नजर समोर ठेवावी. १०-१५ सेंकद याच स्थितीत राहावे.
फायदे
- आसनामुळे मणक्याला भरपूर व्यायाम मिळतो. पोटावर ताण पडून पोटाचे स्नायू मजबूत बनतात. पोटावरची चरबी कमी व व्हायला मदत मिळते. पचनसंस्था मजबूत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
कोणी करू नये - लो बीपी असणाऱ्यांनी करू नये. अस्थमाचा त्रास असल्यास, गरोदर, मासिक धर्मात पहिले २ दिवस आसन टाळावे.