किकवीच्या सरपंचपदी नवनाथ कदम, तर उपसरपंचपदी दीपाली काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:44+5:302021-02-14T04:11:44+5:30
किकवी या गावातील ग्रामपंचायतीवर गेली ४० वर्षे कॉंग्रेसचाच झेंडा फडकलेला आहे. या वेळी झालेल्या किकवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण नऊ ...
किकवी या गावातील ग्रामपंचायतीवर गेली ४० वर्षे कॉंग्रेसचाच झेंडा फडकलेला आहे.
या वेळी झालेल्या किकवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी आठ जागांवर काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रेय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने विजयश्री खेचून आणली. या वेळी सरपंच नवनाथ कदम, उपसरपंच दीपाली काकडे यांचेसह भास्कर सपकाळ, संजय राऊत, अमित निगडे, चित्रा कोंढालकर, परवीन शेख, वंदना अहिरे आणि हे उमेदवार उपस्थित होते. तर ग्रामस्थांमध्ये प्रामुख्याने पॅनलप्रमुख दत्तात्रेय भिलारे यांचेसह रामचंद्र घारे, संजय पाटणे, अर्जुन अहिरे, संभाजी पाटणे, नवनाथ भिलारे, विश्वास निगडे, जयेश निगडे, सुनील अहिरे, नारायण भिलारे, उत्तम अहिरे, आनंदा काकडे, मोहन राऊत, किरण घारे आदी मान्यवर ग्रामस्थांनी निवडणूक शांततेत पार पाडली.
१३नसरापूर किकवी
किकवी येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत आनंद व्यक्त करताना किकवी ग्रामस्थ.