नयना गुंडे यांचा कर्मचाऱ्यांना कारवाईचा दणका, उशिरा आलेल्या अन् गैरहजर असलेल्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:05 AM2018-08-12T01:05:01+5:302018-08-12T01:05:11+5:30
स्वारगेट येथील मध्यवर्ती वर्कशॉपला अचानक भेट देत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी ४० कर्मचा-यांना कारवाईचा दणका दिला.
पुणे : स्वारगेट येथील मध्यवर्ती वर्कशॉपला अचानक भेट देत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी ४० कर्मचा-यांना कारवाईचा दणका दिला. वर्कशॉपमधील कर्मचाºयांच्या गैरहजेरीबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने गुंडे यांनी गुरूवारी अचानक भेट दिली. या वेळी उशिरा आलेल्या तसेच गैरहजर राहिलेल्या कर्मचाºयांवर कारवाईचे आदेश गुंडे यांनी दिले.
‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील मुख्य इमारतीत मध्यवर्ती वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये सध्या सुमारे १४५ कर्मचारी असून बसेसशी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण कामे या वर्कशॉपमध्ये केली जातात. जुन्या बसेसची नव्याने बांधणी, इंजिनची सर्वप्रकारची कामे, आरटीओ पासिंग, गिअर बॉक्स, ब्रेक यंत्रणा यांसह सर्व महत्त्वाची तांत्रिक कामे याठिकाणी केली जातात. त्यामुळे हे वर्कशॉपला महत्त्व आहे. तसेच प्रत्येक आगारासाठीही स्वतंत्र वर्कशॉप आहे. याठिकाणी केवळ प्राथमिक स्वरूपाची देखभाल दुरूस्ती कामे होतात. त्यामुळे या वर्कशॉपला पीएमपीचे हृदय म्हटले जाते.
देखभाल-दुरूस्ती अभावी शहरात ब्रेकडाऊन होणाºया बसेसची संख्या कमी झालेली नाही. हे प्रमाण कमी करण्यासाठी गुंडे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अधिकाºयांच्या बैठका, आगारांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात येतो. तरीही त्यात फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. यादरम्यान वर्कशॉपमधील कर्मचाºयांच्या गैरहजेरीच्या काही तक्रारीही वरिष्ठ अधिकाºयांनी गुंडे यांच्याकडे केल्या होत्या. काही कर्मचारी सातत्याने गैरहजर राहणे, उशिरा कामावर येतात. या वर्कशॉपची वेळ सकाळी ८ ते दुपारी साडेचार अशी आहे. वारंवार ताकीद देऊनही काही कर्मचारी ८.३०-९ वाजता कामावर येत होते. यापार्श्वभूमीवर गुंडे यांनी गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती वर्कशॉपला अचानक भेट दिली. शनिवारी प्रशासनाला सुटी असूनही गुंडे यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाºयांनाही बोलावले होते. अचानक झालेल्या या भेटीमुळे हजर असलेले कर्मचारीही गडबडून गेले. गुंडे यांनी वर्कशॉपची पाहणी केली असता अनेक कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यांनी मग सर्वच कर्मचाºयांची हजेरी घेतली. या वेळी काही कर्मचारी वर्कशॉपमध्ये उशिरा येत असल्याचे पाहून त्यांना प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले.
आगारांनाही अचानक भेटी
तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्या वेळी कामावर उशिरा येणाºया तसेच पूर्वकल्पना न देता गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर अनेकदा कारवाई केली होती. नयना गुंडे यांनी शनिवारी मध्यवर्ती वर्कशॉपला अचानक भेट देत केलेल्या कारवाईमुळे बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी या वर्कशॉपलाही पहिल्यांदाच अचानक भेट दिली. यापुढेही आगारांमध्ये अचानक भेट दिली जाणार असल्याचे समजते.