नयना पुजारी खून निकाल ८ मे रोजी
By Admin | Published: April 27, 2017 05:14 AM2017-04-27T05:14:19+5:302017-04-27T05:14:19+5:30
नयना पुजारी सामूहिक बलात्कार व खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या ८ मे रोजी लागण्याची शक्यता आहे. या खटल्याची
पुणे : नयना पुजारी सामूहिक बलात्कार व खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या ८ मे रोजी लागण्याची शक्यता आहे. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर हे यातील मुख्य आरोपी असून, अन्य एक आरोपी राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार आहे.
८ आॅक्टोबर २००९ रोजी खराडी येथील सिनेक्रोन सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी नयना पुजारी काम संपल्यानंतर बससाठी थांबली होती.
आरोपींनी तिला कारमध्ये लिफ्ट देऊन वाघोली परिसरात नेले. तिच्यावर बलात्कार करून निर्घृण खून केला. राजगुरुनगरजवळील जंगलात तिचा मृतदेह टाकून दिला होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर अंतिम युक्तिवाद करत आहेत. (प्रतिनिधी)